पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/९१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८८ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला बापासही सोडून जाण्यास सिद्ध होते यांत काय नवल आहे ? यांत तिच्या हातून कांहींसा अत्याचार होतों हें खरें; तथापि ज्या स्थितीत ती होती तिचा विचार केला असतां तशा स्थि- तीत तिचा जन्मभर निभाव होणें कठिण होतें, व तिनें जे केले तें निरुपा वास्तव केलें असें समजून कोणीही सुज्ञ मनुष्य सदय अंतःकरणानें तिला क्षमाच करतील असा भरंवसा वाटतो. , आपल्या इकडील एखाद्या नाटकाशीं ग्रस्तुत नाटकाची तुलना करून दाखविली असतां, ह्या नाटकाचा उत्कृष्टपणा वाच- कांच्या विषेष लक्षांत येईल, असें वाटते. प्रस्तुत नाटकांशी कित्येक गोष्टींत साम्य पावणारें नाटक म्हटलें म्हणजे प्रसिद्ध ' मृच्छकटिक नाटक होय, हें मार्गे एके ठिकाणी सांगितलेच आहे. ही तुलना सविस्तर यथास्थित करणें हा जसा महत्त्वाचा तसाच मौजेचा विषय आहे. संविधानकाच्या प्रकरणांत शेकस्पियर कवीप्रमाणेच 'मृच्छ- कटिका'च्या कर्त्यानेही दोन हकीगतींची एकत्र सांगड घालून दे- ण्याची कशी खटपट केली आहे याचा उल्लेख मागे केलाच आहे. याशिवाय ज्या पात्रांत विशेष साम्य आढळून येतें तीं येणें- प्रमाणैः—उच्च कुलशील, व पूर्णदारिद्र्य ह्या वसैनियो च्या ठिकाणी असलेल्या दोन गोष्टी व औदार्य आणि उपजीवनाचें साधन- व्यापार ह्या अॅन्टोनियो याच्या ठिकाणी असलेल्या दोन गोष्टी- अशा चारी गोष्टी 'मृच्छकटिकांतील चारुदत्ताचे ठिकाणी एक- वटलेल्या दिसून येतात. शेकूस्पियर कवीनें कुलशीलानें संपन्न अशीच नायिका प्रस्तुत नाटकांत आणली आहे, तशी शूद्रक- कवीनें आणलेली नाहीं. त्यानें वसंतसेनेसारख्या गणिकेच्या मु- लीला आपल्या नाटकांत नायिका करून अग्रस्थान दिले आहे है। योग्य केलें नाहीं, असे कोणासही कल करावें लागेल. परंतु त्याने असेच कां केले हा प्रश्न सदर किंवा पाहतो त्याच्या मनांत एकदम खुलासा एकाएकीं होत नसल्यामुळे नाटक जो कोणी वाचतो उभा राहतो, व त्याचा त्याचें मन चकीत होतें.