पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हनसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८५ रक्कम दण्याला मजजवळ सोनें तयार आहे, ते व्या व कर्ज देऊन टाकून आपल्या मित्राला संकटांतून सोडवून बरोबर आणा.' या- वरून तिचें थोर मन व उदारपण यांची साक्ष आपणास पटते. याप्रमाणे अॅन्टोनियो या पात्राशी जरी तिचे बरेंच साम्य आहे, तरी अॅन्टोनियो याच्या आंगीं नाहींत असें कांहीं गुण तिच्या ठिकाणी दिसून येतात. विपुल संपत्तीच्या अनुषंगाने प्राप्त होणारें जे औदासीन्य त्याचीही छाया अन्टोनियो याच्याप्रमाणे तिच्या मनावर पढली होती. पण विशेष गोष्ट ही कीं, अन्टोनियो हा आरंभापासून शेवटपर्यंत त्या छायेतून मुक्त होत नाहीं. परंतु पोर्शिया प्रसंग येतांच ताजी तवानी होते, व प्रसंगास योग्य असें शहाणपणाचें व धूर्ततेचे वर्तन करते. अॅन्टोनियो थाच्या प्रमाणे ती निष्क्रिय होवून बसत नाहीं. संकटाचें धोरण दिसतांच तिला काय- द्यांतील कोटी आपोआप सुचते व व्यवहारांतील लटपट ही तिच्या लक्षांत येऊन तत्काळ, प्रसंगावधान धरून ती कार्यास सिद्ध होते. या तिच्या अंगच्या गुणास्तव कित्येक टीकाकारांनी पोशिया ही फाजील हुषार किंवा धूर्त आहे, एवढा नाचरेपणा स्त्रीत्वास शोभत नाही असे झटले आहे. * परंतु वास्तविक विचार केला असतां, जें कार्य तिच्या हातून घडवून आणण्याचा कवीनें घाट . घातला आहे, त्या कार्याला लायक अशीच या पात्राची रचना

  • मत प्रसिद्ध जर्मन टीकाकार हॅझलिट ( Hazlit ) यांचें

आहे. यास उत्तरादाखल म्हणून जी टीका एका टीकाकार खीनें केली आहे, ती लक्ष देण्यासारखी असल्यावरून तींतील लहानसा उतारा येथे देतो:-

  • " Portia clever ! why, the word clever implies some-

thing common-place, in as much as it speaks the presence of the active and perceptive with a deficiency of the feeling and reflective powers. Portia hangs beside the terrible and incorrigible Jew, the brilliant light of her character set off by the shadowy power of his, like a magnificent baeuty-- breathing| Titian by the side of a Jorgeous Rembrant." Mrs. JAMEISON.