पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८६ शेक्स्पियरकृत- 1-नाट्य माला. कवीनें केली आहे. तिची विद्वत्ता, मोठे विचार व व्यवहारज्ञता गुण स्त्रियांच्या ठिकाणी तर काय ? - पण पुरुषवर्गात देखील फारच थोड्यांच्या वांट्यास येत असतील. याच गुणास्तव तिची विचारसरणी व भाषणपद्धतिही फार ढवदार व मुद्देसूद अश आहे. दयाभूत अंतःकरण करण्याविषयों शायलॉक यास तिनें केलेला बोध कसा मासलेवाईक आहे तो पाहण्यासारखा आहे. या पात्राच्या मुखानें कवीनें प्रत्येक गोष्टींत चालढाळपणा' ठेव- याचा अर्थात् तार्तम्य पाहून वागण्याचा बोध केला आहे. तिसरें महत्वाचें पात्र वसैनियो हें आहे. हें पात्र मुख्यत्वेकरून मागील दोन पात्रांस जोडणाऱ्या सांखळीच्या फांशासारखे आहे. एकीकडून तो अॅन्टोनियो याचा प्रिय मित्र असून एकीकडून पोर्शि- येचा प्रियकर आहे. या पात्राच्या आंगचा विशेष गुण हाटला ह्मणजे विवेकबुद्धी हा होय. तो स्वतः उंच कुळांतला असून शीलानें संभावित असा आहे. ही गोष्ट तो अभिमानपूर्वक स्वतः आपल्या तोंडानें बोलून दाखचितो ती अशी : - * “मजजवळ जी कांहीं संपत्ति आहे, तें माझें थोर कुलशील.” त्याजपाशी संपत्ती नव्हती, असें असूनही पोझिंयेसारखी 'धूर्त' स्त्री त्याला भाळते यावरून तो रूपाने देखणा होता, दें स्पष्टच आहे. विषेशतः पोर्शिया त्याच्या पाणी- दार डोळ्यांचे व त्याच्या वाणेदार वर्तनाचे मार्मिकतेने वर्णन करते तें लक्षांत ठेवण्यासारखे आहे. तथापि त्याचें प्रेम पोशिं- येवर किती होते, याचा अंदाज करतां येण्यास आपणापाशी कांहीं साधन नाहीं. किंबहुना धनप्राप्तीच्या इच्छेनें तर पोशियेशीं लग्न करण्याचे धाडस त्य नें मनांत आणले नसेलना, असाही संशय घेण्यास जागा आहे परंतु यांत संतोषाची गोष्ट एवढीच कीं, प्रेमस्थान व द्रव्यप्राप्तीचे स्थान हीं दोन्हीही येथे एकच झाली असल्यामुळे वरील आरोपांस कवीनें सवड ठेवली नाहीं अर्से आह्मांस वाटतें. चवथें पात शायलॉक हैं होय. यासंबंधानें पर्यालोचनांत

  • व्हेनिस नगरचा व्यापारी अंक ३ रा पृष्ठ ११२