पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८४ शेकूस्पियरकृत - नाट्यमाला. मात्र मला अतिशय वाईट वाटतें !' * त्याच प्रमाणे त्याचं हृद- यही अत्यंत मृदु व मायाळू होतें. प्रिय मित्राचा कांही काळ- पर्यंत होणारा वियोग देखील त्याच्याने सहन करवेना. याच कारणास्तव त्याचे मित्र त्याला 'सज्जन' ह्मणतात, व " त्याच्याइतके कोमल हृदयाचे फार थोडें" + अशी त्याची वाखाणणी करतात. परंतु शाथलॉक याशी ह्याच 'सज्जनाची वागणूक पहावी तो कांहीं विचित्रच ! तो शायलॉक यास कशी धमकी देतो पहा 'अरे जा जा ! आजपर्यंत जसा मी तुझ्याशीं वागत आलों तसाच यापुढेही बांगेन, मी तुला कुत्रा ह्मणेन तुझी संभावनाही करीन; पक्के तुझ्या अंगावर थुंकेन व लाथांनी समज. अशा प्रकारची वाग , णूक ह्मणजे वाटपाड्या तंट्या भिल्लाच्या दांडगाईची बरोबरी करणारी नाहीं असें कोण ह्मणेल ? यावरून पाहतां अॅन्टोनियो ह्याच्या ठिकाणीं त्याच्या अंगच्या चांगल्या गुणांचा केवळ अति- रेक झाला होता असें दिसून येते. व याचें प्रायः चित्तही पुढें लवकरच त्याला मिळालें. तथापि तो एक " उत्तम भित्र " होता असें ह्मणावयास कांहीं चिंता नाहीं. अॅन्टोनियो याच्या तोलाचें दुसरें ठळक पात्र ह्यटलें ह्मणजे पोर्शिया हें होय. ती अन्टोनियो याच्याप्रमाणेच धनसंपन्न होती व त्याच्याप्रमाणेंच स्वभावानें सरळ व सढळ हाताची होती असेंही मानावयास जागा आहे. कारण तिच्या पदरीं दासदासींचा परीवार वराच असून तो सर्व संतुष्ट व तिच्यावर प्रेम करणारा होता असे आपण पाहतों. बसैनियो यानें करंडकांची निवड केल्यावर व विवाह निश्चित झाल्यावर जेव्हां अन्टोनियो याजवरील संकटाची हकीगत तिला कळते, तेव्हां ती मागें पुढे न पाहतां, एकदम ह्मणते:- 'कर्जाच्या वीसपट

  • 'व्हेनिस नगरचा व्यापारी' अंक १ ला पृष्ठ ११

1 व्हेनिस नगरचा व्यापारी अंक २ पृष्ठ ७५ S व्हेनिस नगरचा व्यापारी अंक १ ला पृष्ठ ३३ 1 व्हेनिस नगरचा व्यापारी अंक ३ रा पृष्ट ११५