पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८३ ही की, हा प्रतीकार स्वतः पोर्शिया आपले यजमानास थोर मनानें क्षमा करून आपणास मान्य आहे असे दर्शविते व यांत न्यायच झाला असें सिद्ध करतें ! प्रस्तुत नाटकांत मनन करण्यासारख्या विशेष गोष्टी कोणत्या आहेत त्यांची चर्चा केल्यावर, आतां यांतील मुख्य मुख्य पालांची घटना कवीने कशी कशी केली आहे, हें थोडक्यांत पाहू- पहिले ठळक पात्र झटले ह्मणजे ' व्हेनिस नगरचा व्यापारी ' ॲन्टोनियो, हे होय. अन्टोनियो याजपाशीं संपत्ति विपुल होती; " आणि तो तिचा व्ययही इतरांच्या उपयोगी पडण्यांत करित असे. स्वभावाने सरळ, मनानें मवाळ, आणि हाताचा सढळ - अशा या गृहस्थास मित्रांचा काय तोटा ? त्यांच्यांतही त्याचा एकावर फारच जीव होता. त्याच्यासाठी तो आपले प्राणही खर्ची घालण्यास सिद्ध झाला. अशा प्रकारचें मित्रत्व ह्मणजे निरपेक्षं व निर्व्याजच समजलें पाहिजे. ह्याचें लक्षण धीर जनांच्या मताप्रमाणे भर्तृहरि सांगतो तें असें:- पापान्निवारयति योजयते हिताय गुह्यंच गूहति गुणान् प्रकटीकरोति । आपनंत च न जहाति ददाति काले-- सन्मित्रलक्षणमिदं प्रवदन्ति धीराः ॥ नीतिशतक. ह्या शाब्दिक अमूर्त लक्षणालाच शेक्सपीयर कवीने येथे अॅन्टोनियो हे मूर्त स्वरूप दिले आहे, हे उघड आहे. अॅन्टोनियो याच्या अंगचा मुख्य गुण ह्यटला ह्मणजे उदारपणा हा होय. आणि जे उदार असतात ते बहुधा निष्कपट व सरळ असतात. अर्थात् मनांत एक व बाहेर एक अशी त्याची वागणूक नव्हती ह्मणूनच बर्सेनिया पैशाची मदत मागायला आला असतां त्यानें तत्काल उत्तर दिलें कीं: - 'मजपाशीं जें कांहीं आहे नाहीं, तें सर्व जरी तूं उडविलेंस, तरी त्याचे मला काडीइतकेंही वाईट वाटणार नाही. पण अमुक करशील का असा संशय तूं घेतोस हें पाहून