पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

८२ शेस्पियरकृत - नाट्य माला. तेव्हां तो तिला बजावून सांगतो:-" दारांना नीट कुलुप्रै बाल. आणखी रस्त्यांत ढोलकी, तुतारी वगैरे वाजतांना ऐकू आली तरी गडबडीने रस्त्यांत काय चाललें आहे तें पाहायला उगीच खिडकीशीं जाऊं नको; माझ्या घराचे सर्व कान बंद कर, झणजे मी ह्यणतों घराची खिडकीन खिडकी बंद करून घे. यावरून त्याचा आपल्या मुलीवर किती कडक अम्मल होता हैं स्पष्ट होत आहे. आणि त्याचे आपल्या मुलीवर जर एवढे कडक प्रभुत्व होतें तर त्यांतही सदोष असा अन्यायच होत होता, असें ह्यटलें पाहिजे. अर्थात ती अशा स्थितीतून आपल्या वापास सोडून गेली, व बापाच्या कडकपणाचा अशा रीतीनें तिनें प्रतीकार केला यांत न्यायच झाला असे कवीने दाखविले आहे. आतां शेवटले आंग- ठ्यांचें प्रकरण घेऊ. यांत पाहिले तरी देखील प्रत्यक्ष पोर्शियनेच आपल्या पतीवर प्रभुत्व गाजविण्याचा यत्न केल्याचे दिसून येते. तिने लग्नसमयीं त्याच्या बोटांत प्रेमन्वी ह्मणून आंगठी घातली व शपथपूर्वक ती त्यानें प्राणापलीकडे जपून ठेवावी, कोणत्याही कारणा वरून हातची जाऊं देऊं नये असे त्याचेकडून कबूल करून घेतलें. प्रिय पत्नीच्या प्रेमाची ती खुग - तिचे केवढे बंधन ह्मणून सांगावें ! परंतु आपण पुढें अर्से पाहतो कीं, ज्या मित्राच्या साहाय्यानें लग्नाचा योग जुळून येतो, त्या मित्रावर जेव्हां संकट येतें तेव्हां त्यांतून त्याची मुक्तता करणारा वकील ती आंगठी मागतो. अशा वेळीं नाहीं म्हणणें हें कृतघ्नपणाचे असून मरणाइतकेंच दुःखकारक होतें. सारांश आंगठी देणें हेंही मरणाइतकेंच दुःख- कारक व नाहीं म्हणणें हेंही तेवढेच दुःखकारक, अशा वेळी बर्सेनियो यानें शपथेचें बंधन तोडून व वैवाहिक प्रितीचं बंधन शिथिल करून अंगठी हातची जाऊं दिली यांत वस्तुतः वरील तत्वास अनुसरून त्यानें अपराध केला नाहीं; तर केवळ न्याय्य तेच केलें, असं सहजच म्हणावें लागतें- आणि सर्वात चम- त्काराची व कवीच्या कुशलतेची परमावधी म्हटली म्हणजे "व्हेनिस नगरचा व्यापारी अंक २ पृष्ट ५९-६०.