पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ८१ लॉक यानें आपल्या मर्ते मोठ्या काव्यानें, अमुक मुदतीला कर्ज- फेडलें नाहीं, तर रिणको याच्या शरीरांतून आच्छेर मांस कापून घेण्याची अट कर्जरोख्यांत लिहून घेतली; आणि त्याला असें वाटलें कीं, कायद्याप्रमाणे आपला हक्क आपण चांगला दृढ करून घेतला. पण असे करण्यांत न्यायाच्या वरील तत्वाप्रमाणें काय- द्यांचे व नियमांचे बंधन इतकें संकुचित व घट्ट झालें कीं, तेणें करून 'व्यवहारदुष्टता' उत्पन्न झाली. पुढे पोशियेनें कायदेशीर कोटी लढवून याच व्यवहारदुष्टत्वाचा प्रतीकार करून न्याय केला; अर्थात दुष्टत्वाचा प्रतीकार केल्यानें न्याय झाल्याचे कवीने येथे स्पष्टपणे दाखविले आहे. आता करंडकांच्या पणाच्या हकीगतीकडे पाहिले, तर तीतही वरील तत्वच वरील रितीनेच उपन्यस्त केले आहे. पोशि - येच्या बापाने, आपल्यामतें मुलीच्या कल्याणाकरितां ह्मणून, आपले पैत्रिक प्रभुत्वास अनुसरून, मरतेवेळी करंडकांचा पण करून ठेविला; व जो संकेतित करंडक निवडील त्यासच मुलीने वरिलें पाहिजे, असें ठरविलें. आतां यांत कायदेशीर रीतीनें आपल्या मुलीवर बापाचे पूर्ण प्रभुत्व होतें हें खरें; तथापि तें गाजविण्यांत त्याच्यादातून बंधन घट्ट होऊन त्याचा दाब फार झाला व तेणेंकरून, दुष्टबुद्धीचा लवलेशही नसतां, अन्याय उत्पन्न झाला. तेव्हां त्याचा प्रती- कार किंवा परिहार, मुलीच्या सुदैवाने इच्छित वराच्या हातून योग्य करंडकाची निवड झाल्यानें, झाला म्हणून बरे झाले; नाहीं तर तो मोठा सदोष असा अन्यायच ह्मणावा लागला असता. वस्तुतः, ह्या ठिकाणीं कवीनें “ भवितव्यते " चेंच घोडें मध्ये घालून सरासरी वेळ मारून नेली आहे यांत शंका नाहीं. या पुढे तिसरी हकीगत जेसिकेची घेऊ. जो शायलाक आपल्या सन्मान्य कुळाशीं एवढ्या कडकपणानें वागतो, त्याचे आपल्या मुलीवर कितीही प्रेम असले तरी त्याची वागणूक फारशी मायाळू पणाची असण्याचा संभव कमीच. आपणास ठाऊकच आहे कीं, तो आपल्या मुलीस घराबाहेर कोठेही जाऊं देत नव्हता.. रात्रीचे वेळीं तो तिला एकटीला घरांत ठेवून बाहेर जाऊं लागला