पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७८ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. गनट श्रीकृष्ण यानें गुंफलेल्या सत्यभामेच्या वेणीचें वर्णन करीत असतां, वामन पंडितांनी वर्णिली आहे ती येणेप्रमाणे:- हरिकरिं यमुना हो मूद गंगावनाचीं, मिरविं धवल पुष्पी दीप्ति गंगा-बनाची । असित - सित नद्यांच्या संगमी श्री त्रिवेणी -- तशिच यदुपतीनं वातली चित्र वेणी ॥ वामन कृत भामाविलास. आणि शेक्सपियर कवीनेही प्रस्तुत नाटकांत तीन चार कथा- नकांची अशीच चित्रवेणी घातली आहे. महाकवि हे तरी ईश्वरांशच होत, व त्यांची कृति ईश्वरी लीलेप्रमा च चमत्कारमय व वंदनीय होय. तेव्हां अशा कृतीस वरील उपमा सर्वथा शोभणारी आहे, हे उघड आहे. वर संविधानकांची जुळवाजुळव कवीनें कशी केली आहे. याचा ऊहापोह करीत असतां, असें ह्यटलें आहे कीं, कांहीं एक साधारण सर्वमान्य तत्व ज्यांत प्रथित केलेले दिसत आहे, अशा कांहीं गोष्टी एकत्र करून प्रस्तुत नाटकाचे संविधानक कवीनें सिद्ध केले आहे; तेव्हां दें तत्व कोणतें असा प्रश्न सहजच उत्पन्न होतो. त्याचा खुलासा येथें करणें अवश्य आहे. नाटक रचण्यांत कवीचा हेतु काय आहे हें टपणे सांगण्याचा शेकूस्पियर कवीचा परिपाठ नाहीं. प्रस्तुत नाटकाशी बन्याच गोष्टीत साम्य पाव- णाऱ्या " मृच्छकटिक नाटकाच्या आरंभीच कवि उद्दिष्ट कार्याचं दिग्दर्शन करतो तें असें कीं, अवंतीपुरीत राहणाऱ्या चारुदत्त व वसंतसेना यांच्या परस्परांवरील प्रेमास अनुलक्षून, .....सुरतोत्सवाश्रयं 79 नयप्रचारं व्यवहारर्दुष्टताम् । खलस्वभावं भवितव्यतां तथा चकार सर्व कविशूद्रको नृपः ॥ हेंच कार्याचें दिग्दर्शन प्रस्तुत नाटकाच्या संबंधानेही उप. योगीं पडण्यासारखं आहे, हें मार्मिक वाचकांस सांगणें नलगे. परंतु अशी कांहीं परिस्फुटता शेस्पियर कवीनें त्या नाटकांत किंवा