पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/८०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

ने व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७७ क्रांति झाल्याची हकीगत कवीनें जोडून दिली आहे. परंतु ह्या दोनही हकीगतीचा मिलाफ शुद्रक कवीला चांगलासा करितां आला नाहीं, असें ह्मणणे भाग आहे. वस्तुतः, चारुदत्त व वसंत सेना यांच्या सुरतोत्सवाशी राज्यक्रांतीच्या हकीगतीचा अथाअर्थी कांहीएक संबंध बसत नाहीं, इतकेच केवळ नाहीं तर एका हकीगती- दुसऱ्या हकीगतीतील कथेचा परिपोषं व्हावा है इष्ट असतांही, तो मृच्छकटिकांतल्या कथाभागांत झाल्याचे दिसत नाहीं. शेक्स- पिअर कवीच्या प्रस्तुत नाटकांत हा परिपोष कसा उत्कृष्ट रितीने झाला आहे, हें वर सांगितलेच आहे. तथापि दोन कथानके एकत्र गुंफण्याची तन्हा शूद्रक कवीसारख्या अतिप्राचीनकाळी होऊन गेलेल्या आपल्या इकडील कवीच्या मनांत येऊन गेली होती हीं गोष्ट अभिमानपूर्वक येथें उल्लेखित करून ठेवण्यासारखी आहे. वस्तुतः एकाहून अधिक कथानके एकत्र ग्रथित करणें हें बरेंच कठिण असून, त्यांत कौश्यल्यहि विशेष आहे. अशा जुळ- णीस मार्मिक टीकाकारांनी अनेक तंतूंनी विणलेल्या पटाची उपमा दिली आहे. पट विणतांना कारागीर जसें निरनिराळ्या रंगांचे तंतु घेऊन कांहीं सरळ-उभे व कांहीं आडवे अशा रितीनें त्यांची एकांत एक गुफणी करून पट तयार करतो; तशीच नाटककाराचीही गोष्ट आहे. आमच्या मते तर कवीच्या अशा कृतीस गंगा, यमुना, व सरस्वती या नद्यांचा प्रयोग येथे जो त्रिवेणी संगम झाला आहे त्याचीच उपमा अधिक शोभेल. या ठिकाणी या तिन्ही नद्यांचे प्रवाह वेगवेगळे दिसत असूनही, ते एकांत एक अशा रितीने मिसळून गेले आहेत की, त्या सर्वांच मिळून एकच पात्र झाले आहे. हा चमत्कार प्रत्यक्ष परमेश्वरी लीलेचाच होय; व म्हणूनच तो इतका आल्हादकारक व पवित्र होऊन बसला आहे. या त्रिवेणी संगमाची वर्णनीय शोभा विज- ८