पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७६ शेकस्पियरकृत-नाट्य माला. वैरास केवढा जोर आला असेल, त्याची कल्पना करणेच पुरें आहे. आणि जी आंगठी मिळावी ह्मणून वर्सेनियो याच्या प्रित्यर्थ अॅन्टोनियो हा आपले प्राण खर्ची घालतो, तीच जीवा- पलीकडे जपून ठेवावयाची आंगठी बॅसानियो हा त्याच अॅन्टोनियोयाला संकटमुक्त करणाच्या वकिलाला देतो. हें पाहून बर्सेनियो याजवर व बॅसनियो याचे अॅन्टो- नियो याजवर किती निःसीम प्रेम होतें याची कल्पना आपणांस होऊन आपणांस त्यांच्या परस्परांवरील प्रेमाचे मोठे कौतुक वाटते. पण महाशय अन्टोनियोस त्याच्या संकटांतून जिने सोडविलें व सुज्ञ वर्सेनियो यासही आंगठीच्या हानीमुळे वाटलेल्या मरणप्राय मानहानीची क्षमा जीनें केली ती पोशिं- याच होय असे जेव्हां आपण पाहतो तेव्हां तिच्या सुजाणपणाचे व उदारबुद्धिचें जें कौतुक वाटू लागतें त्यास कांही सीमाच राहत नाहीं असें आम्हांस वाटते. प्रस्तुत नाटकांत जीं तीन चार कथानके एकत्र गुंफण्याची खटपट कवीनें केली आहे तिचा विचार करीत असतां, आपले इकडील शूद्रक कविकृत " मृच्छकटिक " नाटकाची आठवण चतुरस्र वाचकांस झाल्यावांचून राहणार नाहीं. शूद्रक कवीनेंही आपले नाटकांत अशीच खटपट कांहींशी केली आहे; हें तर काय? - पण एकंदरीने पाहतां प्रस्तुत नाटकाशी शूद्रक कवीच्या या कृतीचें बऱ्याच गोष्टींत फार साम्य आहे. असें दोहोचें मार्मिक दृष्टीनें अवलोकन केलें असतां दिसून येईल, या साम्यासंबंधाने बरेच लिहिण्यासारखे आहे, तें प्रसंगानुरोधानें लिहूं. सध्या एकाहून अधिक कथानके एकत्र गुंफण्याची खटपट शूद्रक कवीनें कशी केली आहे, हें पाहिलें तर असे आढळून येतें कीं, वसंतसेना व चारुदत्त यांचें परस्परांवरील प्रेम वर्णन करण्याचा जो कवचा मूळ हेतु त्यास अनुसरून नाटकाची रचना करीत असतां, त्यांतच पालक राजाच्या राज्यकारभारांतली अव्यवस्था वर्णन, आर्यक नांवाच्या मनुष्याला “सिद्धादेशा" प्रमाणे राज्यपद मिळून राज्य-