पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ७५ तें आपणास पोशियेची प्राप्ति व्हावी ह्मणून काढतो, व तेणें- करून त्याचा जिवश्चकंठश्च मित्र अन्टोनियो याजवर मोठे संकट येतें. पुढें पोर्शियेचा व वर्सेनियो याचा विवाह होतो आणि या विवाहाने प्रेमबद्ध झालेली पोर्शियाच वकिलाच्या रूपानें पुढें येऊन अॅन्टोनियो याजवरील संकटांतून त्यास व त्याच्या सर्व इष्टमित्रांस मुक्त करून, आनंदित करते. यामुळे, लग्नाकरितां कर्ज व त्या कर्जातून मुक्त होण्याकरितां लग्नाचा योग च साधन, अशी अन्योन्याश्रय घटित कार्यकारणांची सांखळी गुफलेली आपल्या येथे दृष्टीस पडते. ती पाहून जो चमत्कार वाटतो तो केवळ स्वसंवेद्य आहे, इतरानें कितीही सांगितला तरी समजणे कठीण. यास्तव स्वतःच अनुभवून पहावा अशी वाचकांस आमची शिफारस आहे. ८ याप्रमाणे कर्जरोख्याचें कथानक व विवाहाचें कथानक यांची सांगड घालून दिल्यावर आणि एकानें दुसऱ्या कथानकांचा यथाव- काश परिपोष केल्यावर कवीनें या दोन्ही मुख्य कथानकास दोन उप- Vनकांचा जोड दिला आहे. ही दोन उपकथानके ह्मणजे शाय• लोक याच्या मुलीला त्याच्या घरांतून एका ख्रिस्ती मनुष्याकडून नेवविणें व विवाहका प्रेमाची खूण ह्मणून अर्पण केलेल्या आंगट्या-ज्या प्रतिग्रहीत्यानें प्राणापलीकडे जपून ठेऊं ह्मणून शपथ घेतली आहे, त्या आंगठ्यांचे कथानक हीं होत. या दोहों- चीहि जोडणी कवीनें प्रस्तुत नाटकांत फार कुशलतेनें व चातुर्यानें केली आहे. व तेणेंकरून दोनही मुख्य कथानकांतील रसाचें पोषण उत्कृष्ट रितीने केलें आहे. आमचे एक मार्मिक मित्र तर कविच्या या कुशलतेच्या 'जोडणी'स जोडणी न ह्मणतां 'फोडणी' ह्मणतात, सारांश या सुरस फोडणीनें सदर कथानकास कांही अप्रतिम चटक- दारपणा आला आहे, यांत शंका नाहीं. ज्या ख्रिस्ती लोकांविषयीं शॉयलॉक याच्या हृदयांत एवढा द्वेष वाणला होता, त्याच ख्रिस्त्यां- पैकी एका युकःश्चित इसमानें त्याच्या मुलीस पळवून न्यावें हें। त्यास किती दुःसह झालें असेल व तेणेंकरून त्याच्या हाड-