पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७४ त्याच्या शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. असतें. शेक्सपिअर कवीच्या बहुतेक शोकपर्यवसायी नाटकांत व ऐतिहासिक नाटकांत ही तन्हा आढळून येते. परंतु कित्येक वेळा आनंदपर्यवसायी नाटकांत दोन किंवा अधिक कथानकें घेऊन त्यांच्या मिसळीने एक नवेंच संविधानक सिद्ध करण्याचा यत्न कवीनें केकेला आढळून येतो. शेोकपर्यवसायी नाटकांत कांहीतरी अघटित, किंबहुना ध्यानीमनीही न येण्यासारखी गोष्ट अचानक घडवून आणण्याचा हेतु असल्यामुळे वहुतकरून दोन तीन संविधानकांचा मिलाफ जुळवून आणण्याचे कार्य कठीण जात शंसेल असें वाटतें, परंतु ही तन्हा आनंदपर्यवसायी नाटकांत जुळवून आणणे फार सोईचे असलेमुळे शेक्सपिअर कवीनें हिचा आदर आपल्या बन्याच नाटकांतून केला आहे. प्रस्तुत नाटक हैं अशा- पैकी एक होय. " तुफान " नाटकांतही अशीच खटपट कवीनें केली आहे, हें नाटक सूक्ष्म दृष्टीनें वाचले असतां वाचकांच्या 'लक्षांत येईलच. केवळ वरवर पाहिलें असतां ह्या वेगवेगळ्या गोष्टी कोठून तरी आणून कशा तरी गोवून दिल्या आहेत, असें वाटतें. पण सूक्ष्म दृष्टीने पाहिलें असतां त्या सर्वात कांहीं एक साधारण सर्वमान्य तत्व ग्रथित केलेले आढळून येतें, व तें लक्षांत घेऊन नाटकाच्या कथानकाच्या घटनेचा विचार केला असतां सर्व भाग विस्कळीत नसून अगदी सुसंगत आहेत. असें लक्षांत येऊन मनावर हितावह असा परिणाम होतो. याशिवाय जी दोन तीन कथानकें एकत्र जुळविण्यांत येतात त्यांचा मिला- फही फार कुशलतेने केला असतो; ह्मणजे प्रत्येक कथानक बेग- वेगळें विस्तार पावत जाऊन, तें इतरांस व विशेषतः मुख्य कथा- नकास पोषक असें होतें. प्रस्तुत नाटकांत हा मिलाफ कवीनें कसा केला आहे, हें पाहण्यासारखे आहे. वर दाखविलेंच आहे कीं, प्रस्तुत नाटकांत मुख्य कथानक करंडकांची निवड अर्थात पर्शिया आणि बसैनियो यांचा विवाह हें होय. आणि तदनुषंगानें त्यांच्या परस्परांमधील प्रेमाचें वर्धन व पोषण करणें हें होय. हें कार्य कवीनें असें साधिलें आहे कीं, वसैनियों कर्ज काढतो,