पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ६९ आहे; तो न्याय नव्हे. तेणेंकरून अन्टोनिओच्या संकटाचें पारडे फिरलें हें पाहून नाटकांतील पात्रांप्रमाणेच प्रेक्षकांसही मोठा संतोष होतो यांत शंका नाही. प्रस्तुत अंकांतील मुकदम्याच्या चौकशीचा व एकंदर न्यायाचा नमुना कसा आहे हे फार फार लक्षांत घेण्यासारखें आहे. न्याय हा कायद्याप्रमाणे व्हावा किंवा सदसद्विचाराच्या तात्विक दृष्टीने व्हावा किंवा परिस्थिती लक्षांत घेऊन जिकडे आपल्या मनाचा कल असेल त्या कलाप्रमाणे व्हावा - हे सर्व प्रश्न अत्यंत गहन व मोठे विचाराचे आहेत. तथापि पोर्शियन पुरुषद्वेष घेऊन वकीली थाटानें व्हेनीसच्या राजापुढे जे काम चालविलें तें नांवाजण्यासारखें आहे. त्यांतहि तिनें प्रथम दयाभूत अंतःकरण करण्याविषयों जो मुद्दा पुढे आणला आहे तो कोणत्याहि न्यायासनास व राजासनास शोभेसा आहे ह्यांत शंका नाहीं. पोर्शिया काय सांगते तें ऐकाः- " दया ही आकाशांतून सहजासहजी पृथ्वीवर हळू हळू पडणाऱ्या पावसाच्या बिंदु समुदायासारखी आहे.दया ही श्रेष्ठाहून श्रेष्ठ आहे. शिरावर धारण केलेल्या मुकुटापेक्षांहि दयेच्या श्रेष्ठ भूषणानें मंडित असलेला सार्वभौम राजा फारच शोभतो. कोणत्याहि का- मांत न्यायाची व दयेची जर जोड झाली तर ऐहिक सत्ता ही परमेश्वरी- सत्तेप्रमाणे दिसूं लागते. " अंक ५ वा - मागील अंकांत चौकशीचे काम पुरे झाल्यावर व दयेचे व्याख्यान संपल्यावर अंक संपवितां संपवितां आंगठ्यांच्या कथानकांचें एक कुलंगर्डे कवीनें उपस्थित करून ठेविलें. त्याचा उपयोग पूर्णपणे या अंकांत करून त्याने नाटकाचे पर्यवसान जें सुखांत व आनंदांत केले आहे तें फारच बहारीचे झाले आहे. मा- गील अंकांतील चौकशी पहाण्याकरितां आलेल्या उत्कंठित लोकांची गर्दी व त्यांची ओरडाओरड व गडबड या अकांत कोठें हि दिसत नाहीं. प्रेक्षकजन, एकदम बेलमांट येथील शांतस्थळी, थंडगार मोकळ्या हवेंत, आणि चांद्राच्या सुखकारक_मृदु चांद--- यांत येऊन उभे राहतात. दोन्ही कातल्या देखाव्यांत हा