पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

७० शेस्पियरकृत - नाट्य माला. फरक कवीनें फार चातुर्यानें आणिला आहे, यांत शंका नाहीं. अशा स्थळी सर्व मंडळी ' व्हेनीस नगरच्या व्यापान्या ' वरील सर्व संकट विसरून जातात आणि आंगव्याच्या गमतीदार भांड- णांत दंग होतात.

येथवर प्रस्तुत नाटकाचें पर्यालोचन करून, त्यांतील लक्ष देण्या- सारख्या कांहीं गोष्टींचें टिपणही दिले; तेव्हां त्याच्या उत्कृष्टत्वाचा जो एक विशेष गुण म्हणून नांवाजलेला आहे, त्याजविषयी आतां यथा अवकाश विचार करणें योग्य आहे. हा विशेष गुण म्हटला म्हणजे प्रस्तुत नाटकांत तीन चार संविधानकें एकत्र जुळवून सर्वांची एक कथा सिद्ध करण्याचा होय. यांत कवीची जी कुशलता दिसून येते, ती केवळ अप्रतिम होय. ही तीन चार संविधानके कोणती तीं मार्गे दिलींच आहेत. तथापि प्रस्तुत नाटकांत ह्या चारांतून कोणतें संविधानक कवीनें मुख्य धरलें आहे, हें सांगणें कठीण आहे. हीं सर्व कथानकें अशा रीतीनें एकांत एक मिसळून दिली आहेत की, प्रत्येक कथानक आपआपल्या परीनें विस्तार पावत गेले असल्यामुळे महत्वाचंच वाटू लागतें. तथापि निवड

  • • प्रस्तुत नाटकाचा शेवट सुखकारक करताना कवीने कशी बहार

केली आहे त्याचे वर्णन एका इंग्रज टीकाकार खीने केलें आहे. तं फारच मार्मिक आहे ते येणेप्रमाणे:-- Shylock and his machinations being dismissed from our thoughts, and the rest of the Dramatis Personae assembled together at Belmont, all our interest and all our attention are riveted on Portia, and the conclusion. leaves the most delightful impression on the fancy. In conclusion, when Portia invites her company to enter her palace to refresh themselves after their travels, and talk over ' these events at full, ' the imagination, unwill- ing to lose sight of the brilliant group, follows them in gay procession from the lovely moonlit garden, to mar- ble halls and princely revels, to splendor and festive mirth, to love and happiness. MRS. JAMESON.