पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/७१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६८ शेक् स्पियरकृत - नाट्यमाला. शायलॉक याच्या भाषणांतील तर्कशास्त्र अगदी मुद्देसूद असून दुर्भेद्य आहे असे कोणास वाटणार नाहीं ? तसेंच तें ऐकून कोणा सुज्ञ व सज्जन मनुष्यास त्याची कीव आल्यावाचून राहणार नाहीं ? अंक ४ था - प्रस्तुत अंकांत अॅन्टोनिओ याजवरील संक टाचा कळस झाला आहें. असें दाखविलें आहे. त्याजवरील फिर्यादीची चौकशी होते. मागील अंकांत स्वयंवरनिमित्तानें पौशियेवर ओढवलेल्या संकटाचा परिहार वर्सेनिओ याच्या सद- सद्दीचाराच्या बळाने झाला आहे. तसा आतां त्याजवर व त्याचा मित्र अॅन्टोनिओ याजवर आलेल्या संकटाचा परिहार त्याने प्राप्त करून घेतलेल्या पत्नीच्या चातुर्याच्या बळावर होतो. यामुळे त्या सर्वांच्या परस्परांवरील प्रेमांत विशेषच भर पडते यांत शंका नाहीं. या अंकांत मुख्यत्वेंकरून अॅन्टोनिओवरील फिर्यादीच्या चौक शीचा विषय आहे. नेहमीप्रमाणे शायलॉक याचें तर्कशास्त्र दुर्भेद्य व केवळ अचूक आहे असेच आढळून येते. आपली इच्छा तृप्त करून घेण्याची सारी त्याची भिस्त कायद्याप्रमाणें आपला करारनामा पुरा करून घेण्यावर आहे. सदर करारनाम्यांतील अर्थ वसवि- ण्यांत जो कोटीक्रम पोर्शियेनें लढविला तो केवळ कोटिक्रमच

  • या संबंधानें चांगल्यांपैकी एका टीकाकाराचे उद्गार लक्ष देण्या-

सारखे आहेत, तो म्हणतो- Shylock was an ill-used Man and Champion of an. oppressed race; nor is he a hypocrite, like Richard. In fact, Shakespeare, whilst he lends himself to the pre- judices of Christians against Jews, draws so philosophi- cal a picture of the energetic Jewish character, that he

  • traces the blame of its faults to the inequity of the Chris-

tion world. Shylock's arpuments are more logical than those his opponents, and the latter over come him only by a legal quibble. THOMAS CAMPBFLL.