पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ६५ रांतील प्रसंगाचा सुगावा भाषांतरादिकाच्या रूपाने शेकूस्पियर कवीला लागला होता की काय अशी शंका येथे घेण्यास जागा आहे. मागील अंकांत पोशिया ही आपल्या पित्याने करून ठेव- लेल्या पणाबद्दल चिंतायुक्त खिन्नता जेव्हां प्रगट करिते, तेव्हां ती, सीतेच्या वाणीचं अनुकरण करून:- अहह ! दारुण, तात ! तुझा पण !* असेंच जणो ह्मणत आहे असे भासतें. तथापि अशा ठिकाणी प्रसंग सादृश्यामुळे भाषण सादृश्य उत्पन्न झालें आहे, असें माना- वयास चिंता नाहीं. प्रवेश २ रा. पृष्ठ ४१ - येथे लॅन्सलॉट प्रवेश करितो. हैं पात्र हलक्या प्रतीचे असून पशुवृत्तीने वागणाऱ्या माणसाचा हा एक नमुना आहे. तो सरासरी विदुषकाचेंच कार्य करितो. अॅन्टोनिओ यास पुष्कळसे सपाटून बोलण्याचा उपदेश करणारा " बहुभाष ' ग्रॅशियानो हा नुकताच मार्गे येऊन गेला आहे, तोहि विदुषकाचेंच काम करितो हे खरे; तथापि त्याची पायरी लॅन्स- लॉट याच्याहून वरची आहे. लॅन्सलॉट हा प्रथम शायलॉक याच्या घरी नोकर होता, व तो तेथून निसटून जाऊन वर्सेनिओ याजकडे नोकरीस राहूं इच्छितो. शायलॉक याची गृहस्थिति कशी होती याचे ज्ञान वाचकांस व प्रेक्षकांस करून देण्याकरितां हें पाल कवीनें योजिलें आहे हे उघड आहे. चारचौघांत त्याची चालचलणूक कशी होती हे तर आपण पहातोच. पण तेवढ्याने त्याच्या चित्राचें एक अंग मात्र आपल्या दृष्टीस पडते. परंतु लॅन्सलॉट याच्या व शायलॉक याची मुलगी जेसिका हिच्या

स्वयं सीतेचा उद्गार ज्या श्लोकांत आहे तो समग्र श्लोक येणेप्रमाणे आहे:-- मदनशवशरासन है महा मदनमूर्तिच केवळ राम हा । करिल सज्ज कसे धन आपण अहह! दारुण, तात ! तुझा पण ! ॥