पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६४ शेकूस्पियरकृत-नाट्यमाला. लोकांची कशी भयंकर अवस्था झाली होती याचें बरेंच ज्ञान आ- पणांस होते याप्रमाणे या पहिल्या अंकांत या नाटकांतलीं मुख्य मुख्य पायें कवीनें आपणापुढे उभी केली असून पुढे येणारी मुक कशी उद्भवली व त्यांचें बीज कसे पेरले गेलें हे आपणास दा- खविलें आहे. अंक २ प्रवेश १ ला - मागील अंकांत प्रस्तूत नाटकांतली नायिका जी पोशिंया तिजवर स्वयंवराच्या पणामुळे कोणतें संकट ओढवलें होतें त्याचे नुसतें दिग्दर्शन मात्र कवीने केले होते. पण या अंकांत तिच्या पाणिग्रहणाच्या इच्छेनें आलेल्या देशोदेशच्या राजपुत्रांस रंगभूमीवर आणून सदरहु संकट केवळ काल्पनिक नव्हेत इतकेच केवळ नाहीं तर नाथि- केच्या दृष्टीने कसें भयंकर होते हे दाखविण्याची तजवीज कवीने केली आहे. प्रथमच मोरोक्को देशचा शिद्दी राजपुत्र येतो. हा शिद्दी म्हणजे आपलेकडील पुराणांतरींच्या 'शितिकंठधनु ' उचलूं पाहणान्या दशकंठाचीच मूर्ति होय असें त्याच्या स्वपरा- क्रमाविषयींच्या दर्पोक्तीवरून वाटण्यासारखे आहे. सितास्वयंव-

  • यहुदी लोकांच्या स्थितीचे वर्णन एका प्रसिद्ध ग्रंथकाराने येर्णप्र-

माणें केलें आहे:-- In past ages, to the Jew Government was oppres- sion---a power which seized on every pretext which could supply it with an excuse for confiscation of pro- perty, insolent scorn, the dungeon, the thumb-serew. the rack, and death by rope or fire; the priest and the public torturer walked hand in hand; and the despised Jew saw in every Christian an oppressor. They weighed the princes and governors of the land of their adoption in the golden scales of heaven, and found them tyrants and extortioners--- hypocritical and savage; and they mat- tcred---these be the Christian rulers ! • HALLIWEJJ..