पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६६ शैस्पियरकृत - नाट्यमाला. भाषणांवरून त्याचें अंतरंग आपणांस व्यक्त होते. अशा रीतीनें या पात्राचें अंतर्बाह्य स्वरूप आपणांस दाखवून शायलॉक याचा सबंद पुतळा कवीनें आपल्यापुढे उभा करण्याची तजवीज केली आहे. लॅन्सलॉट याच्या पहिल्याच भाषणांत आपल्या धन्याच्या घरून निघून जावें कीं तेथेंच रहावें याविषयीं त्याच्या मनांत जी गडबड उडाली ती तो बोलून दाखवीत आहे. वस्तुतः पहाता, सारासारविचाराने वागणारें मन व केवळ स्वेच्छेनें वागणारी हौस यांच्या मधील भांडण कवीनें या पात्राच्या मुखानें येथे वर्णिलें आहे, व त्यांत अखेरीस पशुवृत्तीस अनुरूप असा अविचाराचा म्हणजे हौसेचाच जय झाल्याचे दर्शविलें आहे. पुढे लॅन्सलॉट याची व त्याच्या बापाची रस्त्यांत गांठ पडते. तो विचारा वृद्ध व आंवळा; त्याची क्षणभर थट्टा करून मजा करण्याची बुद्धि लॅन्सलॉट सारख्या पशुवृत्ती मनुष्यावांचून कोणाला होईल ? पण हे पात्र हास्यरस उत्पन्न करण्याकरितांच योजिलें असल्यामुळे हा चारगटपणा त्याला शोभेसाच आहे असें म्हटले पाहिजे. त्यांतहि तो मर्यादेच्या बाहेर नेलेला नाहीं हें लक्षांत ठेवण्यासारखें आहे. याच प्रवेशांत शेवटी 'बहुभाष' शियानो याला आणून, नुकताच निष्क्रांत झालेल्या पशुवृत्ति विदुषकाशी वरच्या दर्जाच्या बहुभाष विदुषकाचा मुकाबला करून दाखवावा असें कवीनें योजिल्याचे दिसतें. ग्रॅशियानो याच्या मुखाने, फाजील सभ्य- पणाबद्दल कवीने कशी टर उडविली आहे. तिच्यांतील नाजुक खोंच सभ्यपणाचा डौल घालणारांस बहुधा झोंबल्यावांचून राहणार नाहीं. प्रवेश ४ ते प्रवेश ६ - या तीनहि प्रवेशांत जेसिकेच्या पलायनाचे उपकथानक घातले असून किरकोळ पात्रांच्या आग. मननिर्गमनादिकांच्या योगानें गडबड उडवून देऊन प्रेक्षकांस केवळ जागृत ठेवण्याचा यत्न केलेला आहेसे दिसतें. वस्तुतः हे प्रवेश केवळ खोगीरभरती करता आहेत असें म्हणावयास चिंता नाहीं.