पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ६३ अशा दोन कारणांस्तव शायलीकहि त्याचा द्वेष करितो. अशी ही त्यांच्यामधील चुरशीच्या कारणांची संखळी आहे. तिचे दुवे एकांत एक कसे गुंफलेले आहेत हे लक्षांत ठेविलें असतां, शाय- लॉक याच्या भाषणांतली खोंच वाचणारांस तत्काळ कळेल. या प्रवेशांतील शायलॉक याच्या भाषणांतील विचारसरणीकडे लक्ष दिलें असतां अॅन्टोनिओ याच्या पतीविषयीं त्यानें आडून घेत- लेली शंका व समुद्रावर गलबतांतून सांठविलेल्या संपत्तीचा अनिश्चितपणा असल्यामुळे त्याने घेतलेली सावधगिरी या गोष्टी त्याच्या स्थितीस अगदी शोभेशा आहेत. यो भ पुढे अॅन्टोनिओ याची प्रत्यक्ष मूर्ति पाहिल्याबरोबर शायलॉक याच्या मनांत बहुतकाल धुमसत असलेला द्वेषाम्नि एकदम कसा पेट घेतो हे कवीनें एथे थोडक्यांत फार खुवीदार रितीने दाख- विलें आहे. दाबून टाकलेल्या असंतोषाचें व द्वेषाचे स्वरूप करें भयंकर असते याचे दे एक मासलेवाईक उदाहरण आहे. सावकार लोक आपल्या सोन्यारुप्याला शेळ्या मेंढ्या कल्पन त्यांना कसें व्यायाला लावतात ही शायलॉक याची विलक्षण कल्पना ऐकून त्याच्या मजेदार लोभीपणाचें कोणासहि क्षणभर हांसे आल्यावांचून राहणार नाहीं. तशीच प्रतिपक्षानें कितीहि गर्दी केली तरी घाई न करितां थंडपणाने बोलणे चालणे कर- ण्याची व आपला मुद्दा न चुकवितां सावधगिरीने वागण्याची सावकार लोकांची रीत ज्यांस माहीत असेल त्यांस या प्रवेशां- तील शायलॉक याची भाषणपद्धति अत्यंत हृदयंगम वाटेल यांत शंका नाहीं. पुढें योग्य संधी पाहून शायलॉक हा आपले पोटांत डबचत असलेले विचार एकदम प्रगट करितो. व कॅन्टोनिओ यानें त्याची कसकशी मानखंडना केली व त्याच्याशी उद्दामपणाने कशी वागणूक केली हा पाढा वाचून तो त्याची त्यास आठवण देतो. या भाषणांत शायलॉक याने काढलेल्या उखाळ्यापाखा-' ळ्यांचा विचार केला असतां ख्रिस्तीलोकांच्या राज्यांत यहुदी -