पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६२ शेस्पियरकृत - नाट्य माला. तुह्मांस कोहि थारा उरणार नाहीं. ' मरतेवेळच्या तळतळाटानें उच्चारलेली ही शापवाणी पुढे खरी झाली; इतकेंच केवळ नव्हे, तर ख्रिस्ती धर्माचा लौकरच चहूंकडे प्रसार झाल्यामुळे ख्रिस्तास जे अनुयायी मिळाले त्यांनी ती खरी केली असेंहि ह्मणावयास चिंता नाहीं, त्यांनी तर यहुद्यांस दे माय धरणी ठाय करून सोडलें व त्यांस कोठेहि थारा मिळू नये असें केलें. स्पेन व इंग्लंड देशांतून तर त्यांस किती वेळां तरी हद्दपार केले असेल, कोणी यहुदी कोठें आढळला तर त्याची विटंबना वाटेल त्या स्त्रिस्त्याने करावी. त्याची दाद कोठेंहि लागत नसे. तसेच, त्याची मालमिळकत अनेक कारणांवरून सरकारांत जप्त करून घ्यावी अशाविषयीं सदरहु देशांत मुद्दाम कायदे केले होते. यहुद्यांनीं आपल्या धर्मप्रवर्तकास सुळीं दिलें ही जी अढी ख्रिस्ती लोकांच्या मनांत पडली ती कित्येक शतके झाली तरी नाहींशी झाली नाहीं. ख्रिस्तीलोक यहुद्यांचा द्वेष कां करितात याचें बजि वरीलप्रमाणे आहे. उलटपक्षी यहुदीलोक परागंदा होऊन दीन | होत्साते उद्योगधंदा करून राहू लागले. कोणाचा आधार नाहीं, अशा स्थितीत सर्वांस वश करणारा जो पैसा त्याचा आधार त्यांनी जोडला. परंतु आपणांस छळणान्यांविषयीं त्यांच्याहि मनांत द्वेषभाव उत्पन्न झाला तो नाहींसा होण्याला त्यांस कांहीं मार्ग मिळाला नाहीं. बहुधा हे लोक मितव्ययाने राहून साव- कारी करीत असत. मनुष्य एकदा सावकारी करूं लागला कीं, तो धनलोभी होतो व तदनुषंगाने अनेक दोष त्याच्या वागणूकीत उत्पन्न होतात. या दोषांतच जवर व्याज वसूल करण्याची जी इच्छा त्याला होते तिचा समावेश केला पाहिजे. अशा रीतीनें पाहिले तर शायलॉक हा यहुदी आहे अर्थात नीच आहे म्हणून, आणि तो व्याजखाऊ आहे म्हणून, अशा दोन कारणांवरून अॅन्टोनिओ त्याचा द्वेष करितो. उलटपक्षी, अॅन्टोनिओ हा ख्रिस्ती आहे अर्थात आपला छळ करणारा आहे, तसाच तो आपल्या यांच्या आड येणारा असून आपली विटंबना करणारा आहे.