पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ६१ होता, तेव्हां त्याच्या जातीस अनुलक्षून अशा ज्या कित्येक गोष्टी त्याच्या भाषणांत येथे आल्या आहेत त्याचे स्पष्टीकरण करण अवश्य आहे. शायलॉक हा अॅन्टोनिओ याचा द्वेष करितो असे आपण पहातो; आणि तो कां? - तर अयोनिओ हा ख्रिस्ती होता म्हणून. तसेच, अॅन्टोनिओ शायलॉक याचा तिरस्कार करितो आणि याचें कारण इतकेंच कीं शायलॉक द्दा ख्रिस्ती व्यापान्यांस कर्जाऊ पैसे देऊन त्यांजपासून जबर व्याज घेत असे म्हणून. हीं कारण जरी येथे कवीनें दिली आहेत, तरी याच कारणास्तव एकानें दुसन्याचा एवढा पराकाष्टेचा द्वेष किंवा तिरस्कार का करावा हैं गूढ वाचकांस पडल्यावांचून राहणार नाहीं. वस्तुतः याचें बीज यहुदी लोकांच्या इतिहासांत आहे. यहुदी लोकांचा हा इतिहास थोडक्यांत असा आहे कीं, पुरातनकाळी अरबस्थानाच्या उत्तरेस यहुदी लोकांचे फार मोठें व बलाढ्य राज्य होतें. बायबलांतल्या जुन्या करारांत जो धर्म प्रतिपादिला आहे तो त्यांचा धर्म होय. पुढें कालेंकरून त्यांच्यांतच येशुख्रिस्त हा जन्मास आला. त्याने नवा धर्म काढिला, व त्याचा उपदेश तो लोकांस करूं लागला. लोकाचाराप्रमाणे येशुख्रिस्तास बाप नव्हता व तो एका कुमारिकेच्या पोटीं आला असल्यामुळे त्याला आईहि नसल्या सारखीच होती. अशा या अनाथ पोरानें नवोन धर्माचें काढलेले खूळ त्या वेळच्या सनातन धर्माभिमानी प्रतिष्ठित यहुदी पुढा- यांस कसे मान्य व्हावें ? अर्थात् ते त्याची अवहेलना करून लव.. करच त्याचा छळहि करूं लागले. तथापि ख्रिस्ताच्या मतांचा प्रसार होऊं लागला. व त्याला पुष्कळ अनुयायी मिळत चालले. तेव्हां हें पोर आवरत नाहीं असें पाहून यहुदी धर्मादिकाऱ्यांनी राजाची आज्ञा मिळवून त्याला भर चव्हाट्यावर सुळीं दिलें, व त्याच्या शरीरांत मेखा ठोकून त्याचा जीव घेतला. तेव्हां प्राण सोडतेवेळी त्यानें यहुद्यांस शाप दिला. तो असा कीं, ' तुमचें राज्य नष्ट होईल व तुझी देशोधडीस लागाल, जगांत