पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

६० शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. नाहीं.' दोघांची स्थिती अशी असून ख्यालीखुशालींत वाढलेले हे दोघे प्राणी दुखीकष्टी पाहून कोणासहि त्यांची फार कॉव येईल यांत शंका नाहीं. संपत्ती असली म्हणजे मनुष्य चैनीत व सुखांत असतो अशी जी पुष्कळांची समजूत असते ती किती ममूलक आहे या उदाहरणावरून सहज कळून येईल. तथापि अॅन्टोनिओ याच्या उदासीनपणाचें कांहीं एक कारण प्रत्यक्षतः कवीने दाखविलें नाहीं. पोर्शियेची मात्र अशी गोष्ट नाहीं. स्वयंवरांतली आडकाठी हे तिच्या चिंतेचें कारण स्पष्टच आहे. चिंतेच्या कारणांतल्या या फरकामुळे पहिले पात्र चिंते- खाली केवळ दडवून जाते. व कर्जरोख्यांत एक विलक्षण अट लिहून देण्याचे कृत्य करण्यास सिद्ध होते. पण दुसरें सावध राहून विचारानें वागतें. या दोन पात्रांच्या वर्तनांत पडलेला हा फरक कोणाच्याहि सहज लक्षांत येईल. यापुढे स्वयंवराला आलेल्या देशोदेशच्या राजवंशीय मंड- कीच्या गुणावगुणाविषयीं पोर्शिया जीं टीकारून भाषणें करिते ती फार खुवीदार आहेत यांत शंका नाहीं. त्यांत सामान्ये करून त्या त्या देशच्या लोकांच्या आंगच्या गुणदोषाचेंच वर्णन कर- ण्याची कवीनें तजवीज केली आहे. नायिकेच्या मुखानें केलेली ह्रीं वर्णनें वाचून रघुवंशांतील इंदुमतीच्या स्वयंवराच्या वेळच्या वर्णनांची वाचकांस आठवण होईल. दमयंतीच्या स्वयंवराच्या वेळचें ' पंचनळी 'चें वर्णनहि याच मासल्याचे आहे. प्रवेश ३ रा.-यांत प्रस्तूत नाटकांतले महत्त्वाचे व संक्र- टास कारणीभूत असें शायलॉक हें पास येतें. शायलॉक हा जातीनें यहुदी होता; व तो सावकारीचा धंदा करीत असे. सावकारलोक कसे खाष्ट असतात, कसे मतलबी असतात, व कसे हिशोबी व करारी असतात, त्यांची विचारसरणी कशी मुद्देसूद व अढळ असते हैं सर्वांस ठाऊकच आहे; आणि शेक्- स्पियर कवीनेंहि याच नमुन्यावर हे पात्र कसे सुरेख रेखलें आहे हें कोणाच्याहि सहज ध्यानांत येईल. पण शायलॉक हा यहूदी