पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्होनसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ५९ याप्रमाणे अॅन्टोनिओ याच्या अस्वस्थपणाची चर्चा चालली असतां, त्यांचा एक मित्र शियानो हा त्यास सपाटून बोल- ण्याचा उपदेश करितो. ग्रॅशियानो हें पात्र हास्यरस उत्पन्न करण्याकरितांच कवीनें या नाटकांत आणले आहे. त्याचे ' चतु- र्मुख ब्रह्मदेवाच्या चतुर्विध सृष्टी'चे वर्णन फार मासलेवाईक आहे. तरुण असून आजोवाचे सोंग घेणाऱ्या वकध्यानी मंडळीवर त्याने जो येथे ताशेरा झाडला आहे तो तशा मंडळीस झोंबल्यावांचून आणि इतरांस हांसें आणल्यावांचून खचित राहणार नाहीं. पुढे कांहीं मित्रमंडळी निघून जातात व कांहीं नवीन येतात. या नवीनांतच या नाटकांतला नायक जो वर्सेनिओ तो येतो व त्याच्या मुखाने नायिका जी पोर्शिया तिच्या स्वरूपाचें वर्णन थोडक्यांतच पण टुमदार असें ऐकूं येतें व तेणेंकरून तिच्या- विषयीं प्रेक्षकांच्या व वाचकांच्या मनांत उत्कंठा येथपासूनच उत्पन्न होते. प्रवेश २ रा. - पहिले प्रवेशांत नायिकेविषयीं जी उत्कंठा वाचकांच्या किंवा प्रेक्षकांच्या मनांत उत्पन्न होते ती तृप्त करण्या- करितां अथवा वाढवण्याकरितां असेंच म्हणावें- लगेच हा पोर्शि- येचा प्रवेश घातला आहेसें दिसतें. ती येते ती चिंतातुर व उदासवाणी अशीच येते व येतांच ती आपल्या चिंतेची कहाणी आपल्या बरोबरच्या दासीशीं अथवा मैत्रिणीशीं सुरू करिते. मागील प्रवेशांत अॅन्टोनिओ येतो तोहि असाच चिंतातूर व उदासीन असा येतो, आणि पोशिया येते तीहि तशाच स्थितीत येते. परंतु दोघांच्या उदासीनपणांत फार अंतर आहे तें लक्षांत ठेविण्यासारखे आहे. अॅन्टोनिओ याजपाशीं संपत्ती विपुल होती. तो म्हणतो: - ' आणखी माझी किती तरी जिनगी आहे. मी कांहीं यंदाच्याच उत्पन्नावर बसलों नाहीं. ( मांगें पृष्ठ ४ पहा ). पोशियेची स्थिती तरी अशीच होती. ती वर्णन, तिची सत्री नेरिसा म्हणते, ' बाईसाहेब, आपणाला कोणत्याहि गोष्टीची वाण नाहीं, आणि दुःख कसें तें माहित