पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५८ शेकूस्पियरकृत - नाट्य माला. म्हणून तर हा उदासपणा नसेल? विचारी व सुज्ञ मनुष्यास अशी सूचना कांहीं अंतःस्त प्रेरणेने होत असते असें कालिदास कवी - प्रमाणेंच या कवचिंहि मत होतें असें वाटतें. पुढील श्लोकाची वाचकांस येथे आठवण होईलच. णभाव रम्याणि वीक्ष्य मथुराञ्च निषम्य शब्दान् पर्युत्सुकीभवति यत् सुखितोऽपि जंतुः । तच्चेतसा स्मरति नूनममोधपूर्वम् भावस्थिराणि जननांतर सौहदानि ।। शाकुंतल. परंतु कार्यकारणभाव न दाखवितां केवळ दैववादावर भिरत ठेवणारा शेस्पियर नसल्यामुळे प्रत्येक गोष्टींत कार्यकार- दर्शविण्याची त्याची रीत आहे. तिला अनुसरून या पात्राच्या ठिकाणी उदासीनता त्याने दाखविली यांत त्याचा कांही हेतु असावा. तो हेतु कोणता हें पाहिलें पाहिजे, अॅन्टोनिओ हा चांगला विचारी व व्यवहारज्ञ होता, त्यानें शायलॉकसारख्या आपल्या वैन्यापासून पैसे कर्जाऊ काढ- ण्यास तयार व्हावें व अच्छेर मांस कापून देण्याची अट कर्ज- रोख्यांत लिहून द्यावी हैं विलक्षण नाहीं काय ? त्याचा नेहमींचा परिपाठ कसा होता, तो स्वतः तोच बोलून दाखवितो - 'मी जरी. कोणास कर्ज देत नाहीं किंवा कोणाकडून घेत नाहीं, आणि कदाचित असा व्यवहार केला तरी त्यावर व्याज घेण्याचा किंवा देण्याचा माझा परिपाठ नाहीं. * अर्से असून तो अशी अट लिहून देण्यास तयार झाला यांत जो विचित्रपणा आहे त्याचे कारण काय हें दाखवावें एवढाच कवीचा हेतु दिसतो. दें कारण झटले ह्मणजे अॅन्टोनिओ याचे चित्त अस्वस्थ होतें हेंच होय. व म्हणूनच तो अशी अट लिहून देण्यास तयार झाला हे उघड आहे. हें कारण लक्षांत आणले असतां या पात्राची कृति विसंगत नाहीं असे दिसून येईल.

  • अंक १ प्रवेश ३ पान २८ पहा.