पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/६०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ५७ हा देवघेवीचा, व्याजवट्ट्याचा व्यवहार करणारा एक सावकार होता; पण व्यापारी नव्हता. तेव्हां कवीच्या दृष्टीने अँटोनिओ हाच खरा व्यापारी होय व तोच येथे इष्ट आहे हें उघड आहे. मुख्य पात्र बाजूस ठेवून तिसरेच पुढे आणावयाचे, तसेच नाटकांतला इष्टार्थ छपवून ठेवावयाचा ही शेक्स्पियर कवीची सामान्यकरून रीतच होती. ती लक्षांत ठेविली तर या नाटकाचे नामकरण त्या रीतीस अनुसरूनच झाले आहे असे म्हटले पाहिजे. याप्रमाणें सांगण्यासारखी अवांतर माहिती सांगून झाल्यावर आतां प्रस्तुत नाटकाच्या पर्यालोचनास आरंभ करितों. अंक १ला. प्रवेश १, ला. -- शेक्स्पियर कत्रोच्या नेह- मांच्या परिपाठाप्रमाणे प्रस्तुत नाटकाचा आरंभ त्यानें एकदमच केला आहे; व ज्या पात्रावरून प्रस्तूत नाटकाला त्यानें नांव दिलें तेंच आरंभाला तो आपणांपुढे आणून उभें करितों. हें पात्र म्हटले म्हणजे 'व्हेनिस नगरचा व्यापारी,' अँटोनिओ हें होय. तो येतो तो आपल्या दोन मित्रांसह येतो. पुढे लौकर आणखी दोन चार मित्र त्याला वाटेंत भेटतात. काय असेल तें असो, त्याचे जिवाला चैन नव्हतें, त्याचें तोंड उतरलेले दिसत होतें, दृष्टि जड झाली होती, जमलेल्या मित्रमंडळात त्याच्या प्रकृती- विषयीं स्वाभाविकपणेच प्रश्न निघतो व ते आपआपल्या मतें त्याच्या अस्वस्थतेची कारणे शोधू लागतात. खरें म्हटलें असतां, अॅन्टोनिओ याला कोणत्याही गोष्टीची उणीव नव्हती. विपुल संपत्ती व मनासारख्या मित्रांचें प्रेम यांची अनुकूलता असल्यावर त्यास अशी कोणती चिंता असावी हे मनांत येऊन बाचकांस व प्रेक्षकांस त्याच्याविषयीं सहजच कळवला वाटू लागतो. व ते उत्सुकतेनें पुढे काय होतें याकडे त्यांचे लक्ष लागतें. खरोखर, अॅन्टोनिओ याला आरंभीच असा उदासीन कवीनें कां आणला असावा याचा विचार करण्यासारखा आहे. बहुधा त्याजवर पुढें जें संकट यावयाचें होतें त्याचें सूचक