पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५६ शेस्पियरकृत-नाट्यमाला. प्रस्तुत नाटकाच्या गुणदोषविवेचनास आरंभ करण्यापूर्वी एका लहानशाच पण महत्त्वाच्या मुद्याची येथें चर्चा करण्यासारखीं आहे. हा मुद्दा म्हटला म्हणजे या नाटकाच्या नामकरणाचा होय. ह्या नाटकास ' व्हेनिस नगरचा व्यापारी' असें जें लांब- लचक नांव कवीनें दिलें आहे तें कां ? ह्या नाटकांतलें मुख्य व महत्त्वाचें पात्र कोणतें ? - शायलॉक कीं अँटोनिओ ? तसेंच 'व्हेनिस नगरचा व्यापारी ' म्हणून म्हटला आहे तो कोण ?- शायलॉक की अँटोनियो ? खरें म्हटलें असतां, बर्सेनिओ व पोशिया दीं या नाटकांतली नायक व नायिका होत; तेव्हां त्यांच्या नांवांवरून प्रस्तुत नाटकास नांव दिलें पाहिजे होतें. पण तसें कवीनें केलें नाहीं. नांव देण्यांत त्यानें तिसन्याच पात्राला पुढे केले आहे. तें पाल कोणते ? - तर ' व्हेनिस नगरचा व्यापारी.' बरें, व्हेनिस नगरचा हा व्यापारी बसॅनिओ असेल काय ? - नाहीं, खचित नाहीं. कवीनें त्याचें जें वर्णन दिले आहे तें " तो चतुर व सरदारी बाण्याचा दिसला " * इतकेंच. यावरून तो व्यापारी होता असें म्हणतां येत नाहीं. मग हा व्यापारी कोण ? - अर्थात शायलॉक किंवा अँटोनिओ यांतून कोणी तरी एक असला पाहिजे. शायलॉक हें पात्र या नाटकांत महत्त्वाचे व मुख्य आहे यांत शंका नाहीं. व त्याच्या नांवानें नाटकाचें नामकरण करण्यास तो सर्वथा योग्य आहे. फार कशाला ? - प्रस्तूत नाटकाच्या पूर्वी होऊन प्रसिद्ध आहेत त्यांची नांवें शायलॉक या त्यांत आहेत त्यांजवरूनच ठेविली आहेत. गेलेलीं जीं दोन नाटके पात्रासारखीं जीं पात्र तीं नाटकें 'धी ज्यू' ( The Jew ) आणि 'धी ज्यू ऑफ माल्टा ' ( The Jew of Malta ) ह्रीं होत. यांचा उल्लेख मांगें आलेलाच आहे. पण शेकूस्पियर कवीनें प्रस्तूत नाटकांत जो त्याचें जें वर्णन दिले आहे त्यावरून पाहतां ज्यू आणला आहे व त्याच्या दृष्टीनें शाय- लॉक हा 'व्हेनिस नगरचा व्यापारी' नव्हे. कारण, शायलॉक

  • अंक एक, प्रवेश दोन पहा.