पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ५५ कीन यांच्याच कल्पनेचा अनुवाद करून अलीकडील प्रसिद्ध नट सर हेन्री इव्हिंग यानेंहि या पात्राच्या बतावणीत बरीच सुधारणा केली. तो असें ह्मणतों की ' व्हेनिस नगरचा व्यापारी ' या नाटकांत शायलॉक या पात्राचें जें चरित्र आले आहे त्याचे पृथक्करण केले तर त्यांत तीन वेगवेगळे भाग, तीन वेगवेगळ्या स्वरूपांनी दिसून येतात. तो व्याजवहा करणारा सावकार होता हें त्याचें एक स्वरूप; परधर्मी नीच अतएव द्वेष्य अशा त्रि- स्त्यांनीं त्याच्या मुलीला त्याच्या घरांतून काढून नेल्यामुळे कोणाहि बापाच्या मायाळू अंतःकरणांत जे दुःख व्हावयाचें तशा दुःखानें गांगरून गेलेला असा तो एक दुखीकष्टी प्राणी होता, हें त्याचें दुसरें स्वरूप; आणि ज्या कुळाने त्याची जन्म- भर विटंबनाच केली अशा कुळाचा सूड कधीं घेऊं व कसा घेऊं असें ज्याला झाले आहे व शेवटी सुडाची संधी ज्याला प्राप्त झाली आहे असे पाहून कृतार्थ झालेला तो एक धनको व पक्षकार होता हें त्याचे तिसरें स्वरूप अशीं ह्रीं तीन आपले काम करी, तेव्हां त्याची कर्तबगारी पाहुन प्रेक्षकजन केवट थक्क होऊन जात, व मूळ नाटकाची खुबी लक्षांत येऊन त्यांस परा- काटेचा संतोष होई. सारांश, मूळचें नाटक सुंदर व तें वठवि- ण्यांत उत्तम उत्तम नटांचें साहाय्य मिळाल्यामुळे ते इंग्लंड देशांत आबालवृद्धांस अत्यंत प्रिय झाले आहे. आणि आपल्या. इकडेही हे नाटक अशा पद्धतीनें व अशा मार्मिक दृष्टीनें जर वाचकांच्या वाचण्यांत येईल तर तें त्यांसही प्रिय झाल्यावांचून राहणार नाहीं. असा भरंवसा आहे. चित्रे लक्षांत आणून इव्हिग हा जेव्हां रंगभुमीवर (मागील पृष्ठावरून पुढे चालू) सांप्रत लोकमताचे हे मान अगदीं फिरून गेलें आहे ही संतोषाची गोट आहे. हे श्रेय पुष्कळ अंशाने शेकस्पियर कवीला दिले पाहिजे असा आमचा ग्रह झाला आहे. यासंबंधाने लॉर्ड मेकॉले यांचा ·· Civil Disabilities of the Jews हा निबंध बाचून पाहण्यावि- वय वाचकास आमची शिफारस आहे.