पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ५३ होते; व त्याचे प्रयोग कित्येक वर्ष सारखे चालले होते. बरबंज याचेच अनुकरण डॉगेट ( Dogget ) हा नटहि करीत असे. असा धांगडधिंगा घालून हे दोघे नट प्रेक्षकसमूहांत घटकांच्या घटका हांशा पिकवून गंमत करीत असत. पण पुढे मॅक्लीन ( Macklin ) नामें एक नट प्रसिद्धीस आला. त्याने या पात्राचे रूप अगदीं पालटून टाकले. यानें शायलॉक हा जख्ख म्हातारा न दाखवितां, अगदी जवान जरी नव्हे, तरी पन्नाशीला आलेला असा प्रौढ बुद्धीचा मनुष्य होता असे धरून, तो मोठा कावेबाज, दृढनिश्चयी विचारनिमन व आपल्या विचारसरणीत अचूक, हेकेखोर, डावपेच लढविण्यांत कुशल असा रंगभूमीवर आणला. त्याने दाखविलेले शायलॉकचें हें रवरूप व त्याची बतावणी त्या काळच्या प्रेक्षकांस पटली, व सर्वांनीं त्याच्या चातु- र्याची फार वाहवा केली यानंतर कीन (Kean) या नां- वाचा दुसरा एक नट पुढे आला व शायलॉक या पावाच्या भुमीकेचे मॅक्लोन याने दाखविलेल्या स्वरूपांत व बतावणीत त्यानें आणखी बरीच सुधारणा केली. व तेर्णेकरून शायलॉक हा फार विचारों व गंभीरवृत्तीचा असून, त्याला आपल्या पुरा- पवित्र व पूज्य जातीचा पूर्ण अभिमान होता असें प्रेक्ष- तन,

  • मॅक्लीन या नटाची एक मौजेंची आख्यायिका येथे सांगण्यासा

रखी आहे, तीवरून तो आपल्या काळी किती लोकप्रिय झाला होता याची बरीच कल्पना होते, ही आख्यायिका मुळ इंग्रजीत जशी आट- ळली तशीच येथे देतों:-- Mr. Macklin happened to be in a large company of ladies and gentlemen, among whom was theeelebrated Mr. Pope. The conversation having turned upon Mr. Mack- lin's age, one of the ladies addressed herself to Mr. Pope, and suggested that he should write an epitaph when Mr, Macklin died, That I will, Madam Said Mr. Pope. Whereupon the lady rejoined---'Nay, I will give it now.':-- • Here lies the Jew That Shakespeare drew. '