पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५२ शेकूस्पियरकृत - नाट्य माला. असावें असें त्याला त्या वेळीं वाटू लागले होतें. या वेळी त्याने निरनिराळ्या विषयांचें बरेंच सूक्ष्म निरीक्षण केलें होतें. त्याच कारणामुळे त्याचे प्रौढ विचार, त्याची आनंदीवृत्ति वगैरे गुण या नाटकांतील बहुतेक प्रवेशांत, किंबहुना प्रत्येक पात्रांत प्रति- बिंबीत झाले आहेत. अर्थात एकंदर नाटकाची भाषा-सरणी, संविधानक जुळविण्यांत त्यानें ग्रथित केलेले विचार, नाट्यकले- मध्ये त्याने संपादिलेले प्राविण्य, निरनिराळ्या पात्रांच्या स्वभा- वांचा परिपोष करण्याची त्याची शैली, तत्त्वज्ञानाची किंचित झांक आणि उदात्त विचार हे गुण प्रस्तूत नाटकांत पूर्णत्वास पोचलेले दिसून येतात. तेव्हां अनेक गुणांनी परिपूर्ण असें हें नाटक प्रसिद्ध झाल्यावर लौकरच लोकप्रीय झालें; वही लोकप्रीयता त्यास तीनशे वर्षे होऊन गेली तरी आतांपर्यंत अबाधित आहे. या नाटकांत मुख्य पात्र म्हटले म्हणजे शाय लॉक हें होय. आणि तें कवीने कसें वठ- विले आहे व कशा अर्थाने येथे आणलें आहे हे लक्षांत घेऊन तं तसे वठविण्यांत अनेक इंग्रज नटांनीं आपलें बुद्धिकौशल्य खर्चले आहे. वस्तुतः प्रस्तूत नाटकाच्या लोकप्रीयतेचा इति- , हास म्हणजे शायलॉक का पासाची भूमिका घेणा-या नटांच्या कुशलतेचाच इतिहास होय, असें ह्मणावयास चिंता नाहीं. कमीनें हैं नाटक रंगभूमीवर आणले त्यावेळी रीचर्ड वरचेंज ( Richard Burbadge ) नांवाच्या नटाकडे शायलॉक ह्या पात्राची भूमिका होती. तो शेकसियर कवीचा समकाली- नच होता, तथापि त्याला या पात्राच्या कृतींतलें रहस्य बरोबर कळलें होतेंसें दिसत नाहीं. त्याच्या मतें शायलांक कसा होता ?- तर शायलॉक म्हणजे एक जख्ख मातारा, पोकवळलेला, क्रूर, दुष्टबुद्धि, खाष्ट, मानसिक भ्रष्टतेमुळे चळ लागलेला असा कोणी यहुदी होता; व असेंच तो त्याचे सोंग आणित असे. आणि याच धरणावर बसविलेल्या रंगावृत्तीचें पुस्तक ' लॅन्सडाऊन्स व्हर्शन' (Lancedown's Version) या नांवानेंहि प्रसिद्ध