पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्वात. ५१ ही गोष्ट एवढी ह्मणण्यासारखीं चटकदार नाहीं किंवा तीत कांहीं मोठें गूढ तत्वही मोंवून दिलेलें नाहीं; तथापि तिची हकीकत " व्हेनिस नगरचा व्यापारी' या नाटकांतील जेसीका व लॉरेन्झो यांच्या हकीगतीशी बरीच मिळती आहे. तेव्हां या गोष्टीचा शेकस्पियर कवीनें उपयोग केला असेल असे मानावयास जागा आहे आणि शेवटले आंगठीचे कथानक तर ' गियानेटो' च्या -गोष्टींतूनच जशाच्यातसेंच कवीनें घेतलें आहे. याप्रमाणे संविधानकांतील मूळकथानकांचा व उपकथानकांचा इतिहास झाला. त्यावरून कवीनें कोणकोणत्या ग्रंथांचा व लेखांचा आधार प्रस्तुत नाटक रचतांना घेतला ह्याचा बराच खुलासा होईल. यापुढील कलम, प्रस्तूत नाटकाच्या लोकप्रीयतेच; त्याविषयीं आतां लिहावयाचें. वर सांगितलेली कथानके पाहिली तर ती किती साध्यास्वरूपाचीं आहेत हे कोणासहि सांगणे नलगे, पण ह्याच ओबडधोबड आधारावर आपल्या कवीने कशी टोलेजंग इमारत उठविली ती आपणापुढे उभी आहेच. तिच्या अप्रतीम शोभेकडे लक्ष गेलें असतां, प्रेक्षकजन केवळ तटस्थ होऊन स्वातात हे कवींच्या कुशलतेचें फळ होय. मूळचीं साधीं कथा नके जर लोकप्रीय झाली होतीं तर त्यांनाच विशेष आकार देऊन शेकस्पियरसारख्या कवीनें आपल्या कलमानें रंग चढविल्यावर ती कृति अत्यंत मोहक झाली यांत काय नवल? प्रस्तुत नाटकांत कवीच्या बुद्धिमत्तेचा पूर्ण विकास झालेला दिसून येतो. ज्या- वेळी कवीने हे नाटक लिहिलें त्या वेळीं त्याचें वय चांगले चौतिशीला आले होते; आणि अनेक व्यवसायांच्या मनुष्यांनी गजबजलेल्या लंडन शहरी सरासरी बारा वर्षे नाटकाचा धंदा त्याने चालविला होता. अशा स्थितीत अनेक गोष्टींचा त्याला अनुभव येऊन चुकला होता, व आपल्या धंद्यांतहि त्याने चांगले प्राविण्य संपादन केलें होतें. ऐन तारुण्यांत असणारी त्याची उच्छृंखल वृत्ति या वेळी मावळून गेली होती. आनंदपर्यवसायी नाटकामध्ये अनंगाच्या चंचल रंगाहून अधिक महत्त्वाचें कांहीं