पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

५० शेकूस्पियरकृत - नाट्यमाला. त्याजकडे बोट दाखवून राजा म्हणाला बाहेरच्या देखाव्यावर गेल्यानें व्यवहारात अशी फसगत होते इ. इ. अशी एक दंतकथा प्राचीन ग्रीक भाषेत प्रसिद्ध असल्याचें एका शोधक टीकाराने लिहिलें आहे. आपल्या इकडेही अशा कित्येक कथा वर्णिल्या आहेत. रामदासस्वामींच्या बखरीत अशीच एक गोष्ट सांगितली. आहे ती मराठी वाचकांस येथें आठवेलच. स्वामी घोतांडी. आहेत असा त्यांच्या काळच्या कित्येक लोकांचा समज होता, च ते त्यांच्या चेष्टाहि करीत. एकदां स्वामी कृष्णानदीत उभे - राहून पुरश्चरण करीत असतां, कांहीं मंडळी नदीवर स्नान करीत होती व एकीकडे स्वामीची कुटाळकी करीत होती. मंडळी घरो- घर जाऊं लागली, तेन्हां त्यास स्वामीनीं हांक मारू म्हटलें हें घ्या. असें ह्मणून मूठ मूठ रेती प्रत्येकास देऊ लागले, तेव्हां सर्वांनी एकमेकांकडे पाहून, हांसून ती फेकून दिली. पण त्यांच्यात एकजण भाविक होता. त्याने मात्र स्वामीच्या या कृतींत काह तरी गुढ असेल असें समजून दिलेली रेती उपवस्त्राच्या पदरी बांधून घरी आणली. दुसरे दिवशीं पाहतों तो रेती सोन्याची झाली आहे या हकीगतीकडे भाविक दृष्टीने न पाहतां व्यावहारिक दृष्टीनें पाहिले तर यांत सदर भाविक गृहस्थाचे चातुर्यच दिसुन येतें असें ह्मणे भाग आहे. याचप्रमाणे दौपदी, सीता इत्यादि भारतीय स्त्रियांच्या स्वयंवराच्या वेळच्या पणांतही निवडणूकीचेंच तत्व आहे. पण ह्या सर्व कथानकांतले सामान्य तत्व लक्षांत घेऊन व तत्संबं- धाच्या साध्या-सरळ हकीगतीचा विचार करून शेकस्पियर कवीने आपले करंडकांच्या निवडणुकीचें मनोहर कथानक कसें तयार केलें व तें एकंदर संविधानकत करें गोवून दिलें हें फार फार पाहण्यासारखें आहे. य. पुढील तिसरें कथानक बापाच्या घरून मुलीस पळवून नेल्याची गोष्ट. यास आधार ह्यटला म्हणजे मॅसुशियो डी सॅलरनो ( Massusio de salerano ) नामें मनुष्याची जी गोष्ट इटालीयन भाषेत प्रसिद्ध आहे तिचा आहे असें दिसतें. वस्तुतः