पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी- उपोद्घात. ४७ पदाप्रत नेलें. आतां यांत कर्ज घेतल्याचा उल्लेख प्रत्यक्ष नाहीं हें खरें, तथापि शरणागताचे रक्षण करणं हा राजाचा धर्मच आहे, च एकदां अभय दिल्यावर आपले वचन पाळणे होई नीतिदृष्टया त्याचे कर्तव्यच आहे, हें लक्षांत आणलें असतां, राजानें कपो- ताच्या मोबदला म्हणून भारंभार माझें मांस माँ देतो असे झटल्यावर, कजाऊ पैसा परत देण्या इतकाच जबाबदारीचा बोजा त्याच्या शिरावर आला असें होतें हैं उघड आहे. ह्या दृष्टीने पाहिलें असतां, कर्जाकरितां मांस देण्याच्या गोष्टीचे मुलभूत तत्व, अगदी साध्या स्वरूपानें, महाभारतांतल्या ह्या गोष्टीत दृष्टीस पडते, यांत शंका नाहीं. याचप्रमाणे किंबहुना याहिपेक्षां वि- शेष निकट संबंध दाखविणारी अशी एक गोष्ट फारशी भाषेत प्रसिद्ध आहे. तीत एका मुसलमानानें आपल्या शेजान्यापासून आच्छर मांस कापून देण्याच्या शर्तीवर कर्जाऊ पैसे काढल्याची हकीगत आह; इतकेंच केवळ नाहीं तर हा शेजारीहि श्रीमंत यहुदीच होता असंही सांगितलें आहे. ही हकीकत म्यालोन नामें एका शेकस्पियर कवीच्या शोधक भक्तानें बाहेर आणिली आहे. ह्या गोष्टी कशादी मनोवेधक असल्या, व इतर देशांत कितीही लोकप्रिय झालेल्या असल्या, तरी त्या शेस्पियरच्या कानापर्यंत पोहोचल्या असतील असें मानावयास कांहीं जागा नाहीं. वस्तुतः आपलें संविधानक तयार करण्यांत शेक्स्पयर कवीचा सगळा आधार ‘धी ज्यू' (The gew) आणि 'गियानेटो' याची अचाट कृत्यें अथवा पराक्रम' (The Adventures' of Gaongis) या दोन पुस्तकांवरच मुख्यत्वं करून आहे. " घी ज्यू' हें एक नाटक असून तें शेकस्पियरचें ' मर्चंट ऑफ व्हेनीस ' हे नाटक सन १५९८ यांत प्रसिद्धिस येण्याच्या पूर्वी सुमारे एकोणीस वर्षावर रंगभूमीवर आलेलें होतें. ह्यावि- यी स्टीफन गॉसन ( Stephon Gosson ) नामें पुस्तक- कर्त्याने आपल्या 'वी स्कूल ऑफ एब्यूज ' ( ' (The School. of Abuse ) या पुस्तकांत उल्लेख केला आहे. ' धी ज्यू, या