पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४६ शेस्पियरकृत - नाट्य माला. शोधकबुद्धीने लाविलाही आहे, तथापि त्या गोष्टींवरून कवीला आपले नाटक रचण्यांत कांहीं स्फूर्ति मिळाली असें मात्र म्हणतां येणार नाहीं. किंबहुना सदरह गोष्टीशी कवीचा अर्थाअर्थी कांहीं एक संबंध नाहीं. हे जरी खरे आहे. तरी ज्या गोष्टी देशोदे- शच्या लोकांस एवढ्या प्रिय वाटल्या त्यांचीच निवड शेकस्पियर कवीनें कशी केली, हें पाहण्यासारखे आहे. खरोखर लोकांची आवड व कवीची निवड यांचा अशा रितीने येथे मिलाफ झालेला पाहून कवीच्या चातुर्याचं कोणालाहि क्षणभर कौतुकच वाटेल. पहिल्याने आपण कर्जाकरितां मांस कापून घेण्याची गोष्ट घेऊ. अशा आशयाची जी एक गोष्ट महाभारतांत आहे, ती कित्येक पाश्चिमात्य लेखकांनी हुडकून काढिली आहे. ही गोष्ट म्हणजे महाभारताच्या वनपर्वातील उशिनारा राजाची कथा होय. या कथेंत असें सांगितलें आहे कीं एके काळी इंद्र व अनि या देवांनी त्या राजाचे सत्व पहाण्याचा बेत करून, कपोत आणि खगांतक यांची रूपे घेतली. मग गरूड कपोताच्या मार्गे लागला असतां, कपोत स्वसंरक्षणार्थ राजाकडे आला. राजाने त्याला अभय दिलें. लगेच गरुडही मागोमाग तेथे येऊन पोहोचला; ★ व माझें भक्ष्य मला दे म्हणून कपोतास राजापाशी मागू लागला. राजा देईना. तेव्हां राजाचा व गरूडाचा जो संवाद झाला, त्यांत शेवटीं असें ठरलें कीं कपोताच्या भारंभार राजानें आपले मां गरुडाला भक्षणार्थ द्यावे. मग गरुडानें तराजू आणून, एका पारड्यांत कपोताला घातले व दुसन्यांत राजाच्या आं गाचें मांस काढून घेऊन तें घातलें. परंतु कपोताचे पारडे खाली बसूं लागलें. ह्याप्रमाणे जास्त जास्त मांस काढून घातले तरी देखील कपोताचे पारडे नमतेंच दिसूं लागलें. शेवटीं स्वतः राजा पारड्यांत जाऊन बसला तेव्हां मात्र दोन्ही पारडीं समान झालीं. असें पाहून, बरें आहे ' मला खा, पण कपोताला नखही लावू नको' असें राजा गरुडाला म्हणाला. मग राजा सत्वास ढळत नाहीं असें पाहून देव प्रसन्न झाले व त्यांनी राजाला मोक्ष-