पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/५१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४८ शेस्पियरकृत-नाट्यमाला. दुष्ट नाटकांत ऐहिक विषयांची अधाशीपणानें इच्छा धरणारांची काय दशा होते व व्याजवहा करणाऱ्या नीच सावकारांची कृत्ये किती भयंकर असतात. है मुख्यत्वें करून दाखविलें अस- ल्यामुळे, शेकस्पियर कवीने ह्याच इकगितीवरून आपली करंड- काच्या निवडणुकीची हकीकत व शायलॉक बहुद्याच्या अटीच्या कर्जरोख्याची हकीकत घेतली असावी असें दिसतें; निदान शेकस्पियरला ह्या नाटकाचा बराच उपयोग झाला असें माना- वयास चिंता नाहीं. * सांप्रत 'वी ज्यू' हे नाटक उपलब्ध नाहीं. बहुधा तें सामान्य प्रतीचेच असल्यामुळे लौकरच मार्गे पडले असावें, आणि शेकस्पियर कत्रांचें ' मर्चेंट ऑफ व्हेनीस, उत्कृष्ट नाटक प्रगट झाल्यावर तर याचा अगदींच लोप झाला यांत कांहीं नवल नाहीं. त्याची एखादी प्रत आपल्या दाती आली असती तर शेकस्पियर कवीनें त्याचा कितपत उपयोग केला, कोणते पात्र कशा तऱ्हेने सुधारून आपल्या नाटकांत घेतलें, हे आपणांस पहातां आलें असतें, तसें करण्यांस सध्यां जरी कांहीं मार्ग नाहीं. तरी 'धी ज्यू' हें नाटक रचलें गेलें त्याच सुमारास ' गियानेटो याची अचाट कृत्यें, ही कादंबरी नुकतीच प्रसिध्द झाली होती. वस्तुतः ती जरी १३७ - रांत मूळ इटाली भाषेत रचली गेली होती, तरी विशेष प्रसिद्धीस आलेली नव्हती; ती पुढे दोनशे वर्षांनी म्हणजे १५७८ रांत प्रथम छापून निघाली अर्थात ती सहजच शेकस्पियर कवींच्या वाच- ण्यांत आली व त्याने तिचा उपयोग करून घेतला. शेस्पियर च्या नाटकाचा आधार मुख्यत्वें याच गोष्टीवर आहे, असें सदर गोष्टीतील मजकुरावरून उघड उघड दिसून येतें. फार कशाला 'धी ज्यू ' हें नाटक देखील या इटाली भाषेतील गोष्टीच्या आ-

  • स्टीफन गॉसन यानें 'धी ज्यू' या नाटकांचे वर्णन देतांना जे

शब्द योजले आहेत ते फार जोरदार असून बव्हर्भसूचक आहेत ते हे :- The play.represents the greediness of wordly choo- sers and bloody minds of usurers.