पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्होने सनगरचा व्यापारी- उपोद्घात. ४५ आपल्या नाटकांत आणले आहे. व त्याचा शायलॉक या यहुद्या- कडूनच जीव घेण्याचा यत्न करविला आहे. सारांश वर दिलेली विषप्रयोगाची हकीकत लोकांच्या मनांत ताजी असतांनाच शेक्सपि- यर कवीनें हैं नाटक लिहिले असावें असें मानावयास जागा आहे. या दोन्ही गोष्टी सन १५९४. त किंवा त्या सुमारास घडल्याचे प्रसिद्ध आहे. यांत जर कांहीं तथ्यांश असेल तर प्रस्तुत नाटक सन १५९४ त कवीनें लिहिलें असें दर्शविणारी जी वर कित्येक प्रमाणें सांगितलीं त्यांतच यांचाहि समावेश करणें अवश्य आहे. याप्रमाणे प्रस्तूत नाटक कवीनें सन १५९४ त लिहिलें यांत कांहीं संशय नाहीं. तथापि तें त्याच साली छापून प्रसिद्ध झालेलें मात्र दिसत नाहीं. वस्तुतः त्यांतले पहिले चार प्रवेश बदलून कवनें नवीन रचलेले दिसतात. असें सुधारून तयार केलेलें हैं। नाटक सन १६०० शांत कवीच्या संमतीनें अखेर छापून प्रगट झालें. एथवर प्रस्तुत नाटकाच्या रचनाकालाचा निर्णय झाला. आतां ह्या नाटकाचे संविधानक कवीनें कोणत्या गोष्टींच्या आधा- राने तयार केलें हैं पहावयाचे. प्रस्तुत उपोद्घाताच्या आरंभी आह्मीं सांगितलेच आहे की ह्या नाटकांत कवीनें तीन चार वेगवेगळी कथानके एकत्र करून एक नवीनच संविधानक निर्माण केले आहे. तीं कथानकें : – (१) कर्जाकरितां मांस कापून घेण्याची गोष्ट ( २ ) लग्नाकरितां करंडकाची निवड करण्याचा पण; (३) बापाच्या घरून मुलीस पळवून नेल्याची गोष्ट; (४) आंगठ्यांची गोष्ट. वगैरे. तेव्हां हीं कथानके त्याला कोठे आढ. ळली हें पाहिलें पाहिजे. वस्तुतः हीं त्यास एक दोन ग्रंथातच एके ठिकाणीं प्रथीत केलेली मिळाली. अर्थात ही त्याने निरनि- राळ्या पुस्तकांतून मिळविली असें मानावयास कांही आधार नाहीं. तथापि हैं ध्यानांत ठेविलें पाहिजे कीं, बहुधा अशी कथा- नके दंतकथांच्यारूपानें देशोदेशच्या लोकांत प्रचलित असतात; आणि यांचा शोध शेक्स्पियर कवीच्या टीकाकारांनी मोठया