पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४२ शेकस्पियरकृत-नाट्य माला. Meres ) याने के- Stemina ) हा सन १५९८ त रच- कोणत्याहि मंथाच्या रचनेचा काळ मुक्रर करावयाचा म्हणजे तो तीन प्रमाणांनी बहुधा मुकर कारेतात. हीं तीन प्रमाणे म्हणजे ( १ ) प्रत्यक्ष प्रमाण; ( २ ) बाह्य प्रमाण व ( ३ ) अंतःप्रमाण; तर ह्या तीन प्रकारचीं प्रमाणे या नाटकासंबंधानें कसकशी उपलब्ध आहेत, हें पाहूं. प्रत्यक्ष प्रमाण सांपडतें तें हें की, या नाटकाची नोंद स्टेशनर्स रेजिस्टर ( Stationer's Registor ) येथें सन १९९८ त केलेली आहे. यावरून हैं सन १५९८ सालाचे सुमारास कवीनें रचलें असें स्थूल मानाने ठरते. प्रत्यक्ष प्रमाणावरून जे कळते ते इतकेंच. आतां बाह्य प्रमाणे कोणती आहेत, हें पाहिलें तर ती या नाटकाचा उल्लेख इतर कांहीं ग्रंथांत केलेला आढळतो त्यावरून मिळतात. त्यांत फ्रान्सीस मियर्स ( Francis लेला पॅलॅडिस स्टॅमिना ( Palldis ग्रंथ विशेष महत्वाचा आहे. हा ग्रंथ त्याने लेला असून त्यांत त्यानें सर फिलीप सिडने, मारलो व स्पेन्सर यांच्या नांवावरोबरच शेक्सपियरच्या नांवाचाहि पांच सहा स्थळी उल्लेख केला आहे इतकेंच केवळ नाहीं. पण आनंदपर्यत्रसायो नाटका- विषयी बोलत असतांना, शेक्सपिअरकृत "व्देनीस नगरचा व्याः पारी " या नाटकाचा देखील उल्लेख स्पष्टपणे केलेला आहे. अर्थात सन १५९८ पूर्वी शेक्सपिअर कवीनें हैं नाटक रचलें असें जें वर म्हटले आहे, त्याला ह्याने बळकटी येते, तथापि १५९८ साला- पूर्वी कोणत्या सालीं हैं निश्चित होत नाहीं तें नाहींच. तें निश्चित करावयाचें तें इतर पुराव्यावरूनच केलें पाहिजे. हा पुरावा मि. मैलोन या नावाच्या शेक्सपियर कवीच्या एका प्रसिद्ध भक्तानें पुढे आणला आहे. मि. मॅलोन यानें या संबंधाचा शोध चालविला असतां हेन्स्लो ( Henslow ) नांवाच्या गृहस्थाचें कांहीं कागदपत्र व रोजनिशा त्याच्या हाती आल्या, त्यांत ' व्हेनिशीयन कॉमेडी या नाटकाचा उल्लेख आहे. हा देन्स्लो १५९२ चे सुमारास एका नाटकमंडळीचा व्यवस्थापक होता. त्यानें आपलो