पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - उपोद्घात. ४३ व शेक्सपियरची नाटकमंडळी एकत्र केली. अशीएकवटलेली मंडळी ज्या नाटकाचे प्रयोग करीत असत त्यांत 'व्हेनिशियन कॉमेडी ' ( Venitian Comedy ) या नांवाचे एक नाटक होतें. ही व्यवस्था १५९४ पासून १५९६ पर्यंत चालू होती. वर सांगितलेली 'व्हेनिशियन कॉमेडि' हेंच शेक्सपियरचें प्रस्तुत नाटक असावें असें पुष्कळांचें ह्मणण आहे. यावरून हैं नाटक १५९४ त कवीनें लिहिलें असावें असें मानितां येईल. मॅलोनच्या या मताला बन्याच टीकाकारांचीहि संमति आहे. तथापि कित्येक जण हा काल आणखीहि मार्गे नेतात, व याचे कारण येवढेच की मारलो याच्या 'ज्यू आफ माल्टा' (Jeve of Malta) या नाटकाशी शेक्सपी यरच्या प्रस्तुत नाटकाचे फार साम्य आहे; किंबहुना ते नाटक रंग- भूमीवर आलेले पाहूनच त्यासारखेच प्रस्तुतचं नाटक लिहिण्याची शेक्सपीयरला स्फूर्ती झाली असें त्यांचे म्हणणे आहे. पण हें मत खरें दिसत नाहीं. कारण शेकसूपियर कवीनें त्या वेळी स्वतंत्र रीतीने नाटके लिहीण्याला सुरुवातहि केली नव्हती. मग हे नाटक त्यानें त्यावेळीं लिहिलें असें म्हणण्यांत काय अर्थ आहे ? सारांश, १५९४ हेंच साल सर्वानुमतें जें ठरलें आहे तेंच बरोबर आहे. आतां अंतःप्रमणावरून काय ठरते हैं जर पाहिले तर तें वरील अनुमानाशीं प्रतिकूळ नाहीं. अंतःप्रमाणांत मुख्यत्वें ज्या गोष्टींचा अंतर्भाव होतो त्या गोष्टी ाटल्या ह्मणजे कवीची विचारपद्धती, त्याची भाषासरणी, कवितेची तन्दा वगैरे होत. ह्या संबंधाने प्रस्तुत नाटक व "टू जन्टलमेन आफ व्हेराना " हें नाटक, या दोहोंत. बरेच साम्य आढळून येतें. सदर नाटक त्यानें प्रथम सन १५९१ त लिहिले असून पुढे सन १५९४-९५ या सुमारास सुधारून व वाढवून शेवटचें प्रगट केलें. आतां या नाटकाच्या व प्रस्तुत नाटकाच्या विचारपद्धतीत संविधानकाच्या कांहीं प्रसंगांत व भाषासरणांतहि बरेच साम्य दिसून येतें. तें असें कीं, नायिका व तिची दासी या दोघींचें, नायिकेच्या पाणिग्रहणानिमित्त आलेल्या मंडळीसंबंधानें टीकात्मक संभाषण, अंगठीची गोष्ट,