पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

उपोद्घात. "* प्र स्तुत खंडांत • व्हेनीस नगरचा व्यापारी ' हैं नाटक दिले आहे. हें शेक्सपिअर कवीच्या 'मर्चंट आफ व्हेनीस भाषांतर होय. हॅू नाटक सुख- पर्यवसायी आहे. या कवीनें जितकी म्हणून सुखपर्य वसायी नाटके लिहीली आहेत, त्या सर्वामध्ये याची गणना प्रमुखत्वानें केली आहे. यांत वेगवेगळ्या प्रकारचीं तनि चार वेगवेगळी कथानक घेऊन तीं कवीने अशा कुशलतेनें एकल गुंफली आहेत की, त्या सर्वोची मिळून एकच सुरस गोष्ट झाली आहे. कवीचें हें कौशल्य केवळ अप्रतिम आहे. ते सामान्य वाच- कांच्या किंवा टीकाकाराच्याहि एकाएकी लक्षांत येत नसल्यामुळे, या -संबंधानें पुढे प्रसंगानुरोधानें लिहिण्यांत येणारच आहे. तेव्हां असे सर्वोत्कृष्ट नाटक सभ्यां वाचकांपुढे येत आहे; त्याचा ते उत्सुकतेनें आदर करतील अशी आशा आहे. प्रथमतः त्या नाटकासंबंधानें जी अवांतर माहिती सांग- ण्यासारखी आहे ती सांगतों. ह्या माहितीचा क्रम म्हटला म्हण जे नेहमीप्रमाणे असा आहे: - (१) हे नाटक कदीने केव्हां रचलें; (२) कोणत्या कथानकाच्या पायावर व कोणत्या आधा- राने रचलें; व ( ३ ) या नाटकाची लोकप्रियता कशी काय आहे वगैरे. तर ही माहिती त्याच क्रमानें सादर करतों. ५