पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

४० शेकूस्पियरकृत - नाट्य माला. नाहीं. यास्तव त्यांचे येथे प्रसिद्धपणे आभार मानून प्रथम- पासून त्यांचा जो आधार आम्हास मिळाला तो शेवटपर्यंत मिळत राहो एवढेच आम्ही इच्छितों. शेवटी, एका अत्यंत उद्वेगजनक गोष्टीचा येथे उल्लेख केल्यावांचून व त्याबद्दल मनापासून आपली दिलगिरी प्रसिद्ध केल्यावांचून आमच्यानें राहवत नाहीं. ती गोष्ट झणजे स्वर्गवासी ए. एम. टी. ज्याक्सन यांचा नासिक येथे झालेला खून. हे गृहस्थ मोठे विद्वान् होते त्र अत्यंत विद्याभिलाषी होते, यांस संस्कृतांत सोन्याचें पदक बक्षिस मिळालें होतें व त्यांस संस्कृत भाषेची व मराठी भाषेचीही फार आवड असे. शेक्सपिअरकृत नाट्यमालेला प्रथमपासूनच ह्यांचा आश्रय मिळाला होता. अर्थ सादृश्यादि स्थळें, जीं आम्हीं आमच्या भाषांतरांत दर्शविली आहेत, तीं त्यांना फार आवडली होती, व पत्रद्वारे त्यांनी वारंवार आम्हांस प्रोत्साहन दिलें होतें. अशा समर्थ विद्वानाचा आमच्या नाट्यमालेला वियोग झाला ही तिची मोठी हानि झाली ती भरून येणे कठीण आहे. याबद्दल फिरून दुःख प्रदर्शित करून पुरें कारतों.