पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. ३९ जे कोणी तिची सेवा करण्यास प्रवृत्त होतात, त्यांची ही करणी आमच्या दृष्टीनें वरील माकडाच्या कृतीसारखीच होय. आणि खरोखर, मराठीचा अभ्यास न करतां व व्यासंग -न ठेवतां आम्ही तिची सेवा करितों व तिची आस्था बाळ- गत, असें झणणे म्हणजे केवळ माकडचेष्टाच नव्हत काय ? ह्यासाठीं, ज्यांच्या हृदयांत खरी आस्था व सेवा करण्याची बुद्धि वागत असेल त्यांस नम्रपणे एवढेच आमचें सांगणें आहे कीं, -बाबांनों अगोदर मराठी भाषेचा अभ्यास कराव तिचा व्यासंग ठेवा. याखेरीज तिच्या अभ्युदयाचे सर्व यत्न लंगडे होत. केवळ इंग्रजी थाटाची संमेलनें भरविल्यानें, व कोणा राजानें पुष्कळसे पैसे दिले, की अशा संमेलनास येऊन कोरडी वटवट केल्यानें, कांहीं कार्यभाग होईल असे नाहीं. मराठी भाषेचा अभ्यास व व्यासंग ठेवणे हाच तिच्या 7 अभिवृद्धीचा उत्तम उपाय आहे. आणि तो सर्वोच्या हातचा आहे. तो अमलांत आणण्यासाठी दुसऱ्यावर अवलंबून राहण्याची कांहीं गरज नाहीं. यासाठी त्याचाच अंगीकार करून तिच्या सेवेची खटपट करावी; हें मराठी भाषेच्या आस्थेवाईकांस - सरतेशेवटीं सुचवून हा लेख पुरा करिता. आतां आमच्या एका मित्राचे आभार मानण्याचें मात्र उरले आहे. हे मित्र ह्यणजे रा० रा० दाजीसाहेब ऊर्फ वासुदेव नारायण वैद्य. हे होत. पुणे शहरांत ज्या ज्या -गृहस्थांशी नाट्यमालेच्या काम आमचा संबंध आला, त्या • सर्वात वरील गृहस्थांइतकी मदत आम्हास कोणाची झाली