पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४१

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३८ शेक्स्पियरकृत-नाट्य माला. हैं आमचे कर्तव्य आम्ही समजतों व याच बुद्धीनें आम्ही वरील लेख लिहिण्यास प्रवृत्त झालों, तरी वर सांगितलेल्या अपायकारक गोष्टींचा मराठी भाषेच्या आस्थेवाइकांनी व तिची सेवा करूं इच्छिणारांनी योग्य विचार करून त्या टाळण्याचा यत्न करावा, अशी त्यांस आमची मनःपूर्वक विनंती आहे. मराठी भाषेची सेवा करितों म्हणून म्हणाव- याचें, आणि तिला अपायकारक अशा गोष्टींचा अंगीकार करून तिचे लचके तोडायाचे ! ही काय सेवेचीरीत ! वहा 'काय आस्थेचा प्रकार ! ही मराठी भाषेच्या आस्थेवाईकांची तन्हा पाहून आम्हास तर ' गोसावी आणि त्याचें माकड' ह्या गोष्टीचीच आठवण होते. ही गोष्ट थोडक्यांत अशी आहे कीं, एका गोसाव्यानें एक माकड पाळलें होतें. तें मोठें झालें, तेव्हां मला कांहीं सेवा सांगा म्हणून धन्याला म्हणूं लागलें. नको नको म्हणत असतांही, माकड हाणाले - " स्वामी, तुह्मी समाधी लावून बसलां म्हणजे, कोणापासून पीडा होऊं नये म्हणून मी तुमचे जवळ पहारा करीत बसतो.' फारच आग्रह पाहून, , गोसावी म्हणाला- 'बरें, तसें कर.' मग गोसावी समाधी लावून बसला असतां व जवळ माकड त्याजकडे डोळे लावून पहारा करीत असतां, एक माशी गोसावांच्या गालावर येऊन बसली. माकडानें दोन चार वेळां तिला हाकलली, तरी ती पुन्हा पुन्हां येऊन बसे. तेव्हां माकडास मोठा त्वेष येऊन माशीस पकडण्याच्या बुद्धीनें त्यानें गोसाव्याच्या गालावर कडाडकन पंजा मारला व गालाचें रक्त काढलें ! मराठी भाषेचा योग्य अभ्यास न करितां व तिचा व्यासंग न ठेवतां