पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. ३७ यांत रसिकत्वाला कांहीं सीमा राहिली ? बरें, अशी ही ताज्या प्रचलित विषयावर रचलेलीं कोरी करकरीत पुस्तकें दर वर्षात सहा सहा वाचकांच्या हातीं देण्याचा ' रंजित रंजक नाटकांच्या कर्त्याचा संकेत आहे, धन्य आहे ! विचारा शेक्सपिअर !-त्याची बुद्धिमत्ता येवढी लोकोत्तर खरी पण त्याच्याने देखील वर्षाकाठी एखाद- दुसरे नाटक रचण्यापलीकडे कांहीं झालें नाहीं. एकूण ह्या नाटकमालच्या निर्माणकर्त्यानें शेक्स्पिअर कवीवरही ताण केली ! खरोखर, ज्या वटोदर नगरांत ( बडोदेशहरांत) अर्शी अजब नाटके निर्माण झाली त्या नगराला व गुणज्ञतेनें ज्याने आश्रय देऊन तिचे कर्त्याला रसिकतेनें प्रोत्साहन दिले त्या वटोदर नगराच्या अधिपतीलाही हैं मोठें भूषण होय, अधिक काय म्हणावें ? इ. इ. " एवढे पुरे. अशा या रसद्दिन लेखांविषयीं व ग्रंथाविषयीं जितकें लिहावे तितकें दवेंच आहे. तथापि सध्याच आम्ही तसें करूं इच्छित नाहीं. केवळ वरील पत्रद्वारा याचे आम्ही दिदर्शन करून वाचकांचं लक्ष तिकडे वेधेल एवढेच येथे केले आहे, तरी मराठी भाषेच्या आस्थेवाईकांनी त्याचा अवश्य विचार करावा. असे आम्ही इच्छितों. मराठी भाषेची अभिवृद्धि व्हावी, व आपल्या हातून तिची सेवा व्हावी, अशी पुष्कळांची इच्छा सांप्रत दिसून येते, तशीच ती आमचीही आहे. यास्तव मराठी भाषेच्या अभिवृद्धीला अपायकारक म्हणून ज्या गोष्टी असतील त्या सर्वोच्या नजरेस आणण, व त्यांचा स्पष्टपणे निषेध करणे.