पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३९

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३६ शेक्स्पियरकृत-नाट्यमाला. तयार झालेच ! नाट्यकलेविषयी कोण ही विचित्र कल्पना! सरासरी संवाद रूपाने मजकूर लिहिला व त्यांत प्रवेश अंक असे भाग पाडले, कीं झालें नाटक तयार, अशीच या 'रंजितरजंक नाटकांच्या निर्माणकर्त्याची समजूत आहे की काय कोण जाणे ! आतां या कर्त्यानें " रंजित व रंजक" शब्द कोठून आणले. हें पाहूं ? वस्तुतः हे शब्द कधीं कोणाच्या बोलण्यांत व लिहिण्यांत येत अस तील किंवा कोठें आले असतील असें वाटत नाहीं. मग असे अप्रसिद्ध व संदिग्ध अर्थाचे शब्द पुस्तकाच्या नांवातच गोवून देण्यांत काय मतलब असेल तो असो. कदाचित, हें नांव वाचून याचा अर्थ तरी काय याचाच विचार वाच- कांनी करीत रहावे असा तर हेतु यांत नसेल ? कारण, प्रत्यक्ष आंतला मजकूर वाचून तर वांचकांचें जें मनोरजन होणार, तें पुढे होईल. पण प्रथमारंभी नुसतें नांव वाचूनच मंडळींनीं खूप व्हावें, अशी ही युक्ति दिसते. असे असेल तर मोहक नांवावर आपली औषधे खपवू पाहणाऱ्या कित्येक वैद्यांच्या युक्तीप्रमाणेंच हीही अजब म्हटली पाहिजे. अर्थात् त्यांचाच कित्ता वरील युक्ति योजणारांनीं उचलला हें उघड आहे. बरें, अशा ह्या अमोल पुस्तकांना किंमत ठेविली असून त्यावर ती घेणारास एक हजार पानांचें " पाश्चात्य देशच्या नामांकित नाटककारांच्या भाषांतराचे एकेक भलें लह पुस्तक बक्षिस देऊं केले आहे तें वेगळंच. अर्थात् ' रजित रंजक ' पुस्तकें किंमतवान् होत, आणि पाश्चात्य देशच्या नामांकित नाटककारांची नाटकें फुकट बिन किमतीचीं, त्यांना किंमत नाहीं ! अशीच ही तन्हा झाली ह्मणावयाची, नव्हे काय ? आतां बोला !