पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३८

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. ३५ उत्पन्न करण्याचा यत्न कोणी उद्योगी मनुष्य करितात, तसाच यत्न केल्यावर 'रंजित' रंजकाचाही कांहीं अर्थ •बसला. तथापि तो कितपत खरा आहे हैं एक परमेश्वरास तरी विचारले पाहिजे किंवा प्रत्यक्ष या मालेच्या निर्माण - कर्त्यानेंच या गोष्टीचा उलगडा केला तर न कळे! पुस्तकाला समर्पक नांव देणे, ही खरोखर मोठी महत्वाची गोष्ट आहे, - तशीच मोठ्या विचाराचीही आहे. केवळ ग्रंथाच्या व लेखा- च्या नांवावरूनच लेखकाच्या चातुर्याची कल्पना होते व आंतील मजकुराची किंमत होते. पण 'रंजित रंजक' नाट- कापैकीं कांही अशीं आहेत कीं, त्यावरून पुस्तकाला वाटेल तें नांव दिले तरी चालतें. अशीच तें लिहिणाराची सरासरी समजूत आहे असे म्हणावें लागते. ही नाटके लिहिणाराला विषयाची निवड म्हणून कांहीं आहे, या गोष्टीचा गंधही नाहीं. चालूं प्रचलित विषयांवर नवीं कोरी करकरीत नाटकें लिहून वाचकांस अर्पण करण्याचा त्याचा बाणा आहे. . ह्याबद्दल तो स्वतःच आपल्या प्रसिद्धिपत्रकांत आश्वासन देत आहे. अमूक गोष्ट म्हणजे नाटकाचा विषय होण्याला अपात्र आहे किंवा हात धरण्याला अग्राह्य आहे असें त्याला वाटत असल्याचें बिलकूल दिसत नाहीं. बंगाल्यांत वंगभंगाची हुल्लड उठली की पुरे, यांना नाटकें लिहिण्याला प्रचलित विषय मिळालेच. ' वंगभंग नाटक' 'टिळककेस नाटक' बा- रिसाल धामधूम नाटक' 'स्वदेशी आणि बहिष्कार नाटक. ' च्या नाटकेच नाटकें ! उद्यां मुंबईसारख्या गडबडीच्या शहरांत खटारा गाडी रस्त्यावर मोडली व शेंकडों लोक सभोवती जमा झालेले ह्यानीं पाहिले कीं, ह्यांना नाटकाला प्रचलित विषय मिळलाच, आणि यांचे 'खटारागाडी नाटक '