पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३४ शेकूस्पियरकृत - नाट्यमाला. भाषेच्या अभिवृद्धीला अत्यंत अपायकारक होत असें आमचे म्हणणे आहे. कारण, मजकुराचा पुळपुळीतपणा, व पोरकटपणा पाहून वाचणारांस त्यांचा केवळ कंटाळा येऊनच राहात नाहीं, तर त्यामुळे एकंदरीने स्वभाषेविषय तिटकारा येण्यास देखील कारण होतें, अशा ग्रंथासंबंधानें व लेखासंबंधानें आमच्याकडे आमच्या एका विद्वान मित्राचे एक लांबचलांब पत्र आले आहे. त्यांतून येथे लागू पडण्यासारखा कांहीं भाग आम्ही उतरून घेतो. हे मित्र लिहितात :- " मराठीत अलीकडे जे रसहीन ग्रंथ व लेख येऊ लागले आहेत त्यांसंबंधानें मी आपल्याजवळ पुष्कळ वेळां बोललो आहे. मला वाटत होतें कीं, ह्यासं- बंधानें कोठें तरी कोणी कांही लिहील, पण कांहीं नाहीं ! जिकडे तिकडे गपचीप ! नुकतीच माझ्या हातीं 'रंजित रंजक नाटकांची कांहीं पुस्तकें आलीं. मला नाटके वाचण्याचा नाद आहे. हैं आपणांस माहितच आहे. म्हणून, तीं घेऊन वान्वूं लागलों, तों वर म्हटलेल्या रसहीन पुस्तकांचाच नमुना पहावयास मिळाला.सकृद्दर्शनीं ह्या नाटकमालेच्या नांवाचा अर्थ तरी काय ? हाच प्रश्न माझ्या पुढे उभा आणि मीही आपणास हाच प्रश्न करितों कीं, रंजक' तें काय हो ? कृपा करून याचा अर्थ तुम्ही सांगाल काय ? ह्याचा अर्थ बसविण्याची मी तर आमच्या मित्रमंड- ळीशीं पुष्कळ खटपट केली. पण नीटसा अर्थ बसेना. शेवटी, म्हाताऱ्या मनुष्याच्या तोंडावर पडलेल्या सुरकत्यांतून जसा एखादा श्लोक कोणी बसवतात, अथवा शेतांत उन्होंने जमिनीला पडलेल्या भेगांतून जशा अक्षरांच्या ओळी राहिला. • रंजित