पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३६

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. ३३ नाहीं. उदाहरणार्थ- तू म्हणजे Thou ह्या एकेरी अर्थाच्या शब्दाच्या ऐवजीं you म्हणजे तुम्ही हा अनेकवचनीं शब्द सामान्येंकरून नेहमीं योजितात, हें सर्वास ठाऊ- कच आहे. आणि ह्याचे कारणही छें उघडच आहे कीं, दुसन्याशीं बोलतांना 'तूं, तूं' 'तुझें, तुझें' असे एकेरी बोलणें उद्धटपणाचें वाटर्ते. ह्याप्रमाणे एकवचनाच्या टिकाण अनेकवचनीच प्रयोग करण्याची वहिवाट एवढी सार्व- त्रिक असतांही, प्रोफेसर भानू यांचे तिकडे लक्ष गेलें नाहीं ही मोठी आश्चर्याची गोष्ट नव्हे काय ? मराठींत नावाज- लेल्या लेखकांची जर ही दशा तर तेथें सामान्य जनांची कथा काय ? यास्तव एकवचनाची व अनेकवचनाची ही कथा आम्ही मुद्दाम वाचकांपुढे गाइली आहे. तरी तिचा ते योग्य विचार करतील असा आम्हांस भरंवसा आहे. एथवर इंग्रजी भाषापद्धतीच्या अनुरोधानें मराठी भाषेत शब्दाचे जे अपप्रयोग होऊं लागले आहेत, त्या- विषय लिहिले. ह्या अपप्रयोगांच्या सुळसुळाटामुळे भाषेची कशी हानी होत आहे, व तिच्या अभिवृद्धीला कसा अडथळा येत आहे त्याचा विचार करणें अत्यंत मह त्वाचें काम आहे. त्याचप्रमाणे मराठी भाषेत असे कित्येक ग्रंथ व लेख पाहण्यांत येतात कीं, त्यांचाही विस्तारानें वेगळा विचार करण्याची फार आवश्यकता आहे. ह्या ग्रंथांत व ह्या लेखांत बहुधा अर्थाची उणीव, मुद्देसूद विचारांची उणीव, व सामान्यत: रसिकत्वाची उणीव, अशी सर्वच प्रकारें उणीव असते. त्यांचें थोडक्यांत वर्णन करूं म्हटलें तर असे ग्रंथ व लेख ' अरसिकचे दर्शक होत ' एवढे सांगितले म्हणजे पुरे हे ग्रंथ व लेख एकंदरीनें पाहतां मराठी