पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३२ शेस्पियरकृत - नाट्यमाला. .) बहुवचन प्रयोग केला असतां तो अशा ठिकाणीं आद- रार्थीच समजतात व तेणेंकरून एकवचनाचाच बोध होतो असे मानतात, मग स्वतः संबंधाने व्यक्तिवाचक बोला- वयाचें झालें असतां एक वचनाच्या ऐवजीं बहुवचनीं प्रयोग करण्यास तरी काय हरकत आहे ? व तेणेंकरून एकत्वाचाच बोध होतो असे मानावयास तरी काय हरकत आहे? इंग्रजी भाषेत एकाच व्यक्तीविषयीबोलणे झाले तर ( ती व्यक्ति किती सन्माननीय असो ) तिजविषयीं नेहमीं एकवचनींच प्रयोग करण्याची वहिवाट आहे. उदाहरणार्थ:- Lord Morley, saysa Sir George Clerk declares, Justice Sir Narayanrao Chandevarkar concludes इत्यादि. याचेंच भाषांतर करणे झाले तर मोर्ले ह्मणतो, सर जार्ज क्लार्क जाहीर करतो. न्यायमूर्ति सर नारायणराव चंदावरकर निर्णय सांगतो वगैरे अशा एकेरी शब्दांचा प्रयोग करणे योग्य नाहीं, हें कोणाही सांगेल. आणि जर कोणी करतील तर त्यांनी जाणून बुजून सदर थोर राज- मान्य व्यक्तींचा अपमान किंबहुना तिरस्कारही केल्याबद्दल नवीन कायद्याप्रमाणें राजद्रोहाचा आरोप त्यांजवर आण- ल्यास कांहीं चूक होईल काय ? आणि एथवरही जरी कोणी मजल न आणली तरी आमच्या सरस्वतीच्या राज्यांत तरी त्याच्या पदरी अविनयाचा व पोरकटपणाचा दोष बांधण्यास आह्मी चुकणार नाहीं. एकत्वाचा अर्थ दाखवावयाचा असतांही आदरार्थी बहुवचनीं प्रयोग कर- ण्याची चाल आमच्या मराठी भाषेतच आहे असें नाहीं, तर ज्या इंग्रजी भाषेचे आमची मंडळी एवढे अनुकरण करूं इच्छितात, त्या इंग्रजी भाषेतही अशी तन्हा नाहीं असें