पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३४

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. ३१ प्रयोग केल्याने अहंपणाचा बोध तो. अशी आपली समजूत आहे, आणि अशी आपली समजत जोपर्यंत आप- णांत आहे तोपर्यंत तिच्याकडे दुर्लक्ष करून उपयोगही नाहीं. 'मी' व ' माझें ' ह्या शब्दांच्या प्रयोगांत जो. अहंपणाचा व उद्धटपणाचा अर्थ आहे, त्यावर कटाक्ष ठेवून, प्रसिद्ध माहाराष्ट्र कवि विठोबा अण्णा यांनी एक मजेदार आर्या संस्कृतांत रचलेली प्रसिद्ध आहे, ती ही:- सदन में, बसनं मे जाया में, मित्रबंधु मे । इति मे मे कुरवाणं कालवृको हरति नरमेषम् ॥ सुश्लोकलाघव. ह्याचा भावार्थ हा की' मे ' हागंज माझें अर्थात 'हें घर माझें, र्हे वस्त्र माझें, ही भार्या माझी आणि हा मित्र- वर्ग व बंधुवर्ग माझा. याप्रमाणे ' मी, मी ' करणा-या अशा नररूप मेषाला ( मेंढ्याला ) काळरूपी लांडगा तत्काळ गट्ट करून टाकतो. यास्तव आमचें असें सांगणें आहे कीं, मराठीत लिहिणारांनी 'पोरकटपणानें 'मी, मी ' ह्मणून मेषपात्र न बनतां ' आह्मी ' व ' आमचे ' अशा प्रौढ शब्दांचा उपयोग करावा; हेंच त्यांस योग्य आहे. ' मी ' च्या ठिकाणीं ' आह्मी ' म्हटल्यानें व्यक्ति समुच्चयाचा मुळींच बोध होत नाहीं. हे लक्षांत ठेविलें पाहिजे. एकवचनी शब्दाच्या ऐवजीं अनेकवचनीं शब्दांचा उपयोग करून, विनय अथवा आदरबुद्धि दर्शविण्याची रीत सार्वत्रिक आहे. आदरार्थी बहुवचनीं प्रयोग केला झणून बाहुल्याचा बोध होतोच असें नाहीं. पहा की, ' बाबा आले?' असें मुलानें म्हणतांच त्याला 'अरे मुला, तुला किती बाबा आहेत ' असा प्रश्न कोणी करतो काय ? सारांश,