पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

३० शेकूस्पियरकृत - नाट्य माला. कोणतेही पुस्तक घेतले तरी त्यांत असा नियम दिलेला आढळतो कीं, स्वतःसंबंधानें व्यक्तिविषयक बोलर्णे झालें तर नेहमी 'मी ' (I) हा शब्द योजीत जावा. राजे, पत्रकर्ते, अध्यक्ष इत्यादिकांनी मात्र आम्ही ह्या शब्दाचा उपयोग करावा. हाच शाळेत पाठ केलेला नियम लक्षांत घेऊन प्रोफेसर साहेबांस वरील फेरफार करण्याची बुद्धि झाली, हे उघड आहे. पण मराठी भाषेतील रुढि ह्या नियमाच्या उलट आहे. ही गोष्ट त्यांच्या लक्षांत आली नाहीं. कारण मराठीचा अभ्यास व व्यासंग कोठें आहे ? तो जर असता तर त्यांच्या तत्काल लक्षांत आलें असतें कीं, मराठी भाषेत स्वमत सांगतांना जर 'मी' असा प्रयोग केला, तर त्यांत अहंपणाचा अर्थ सूचित होऊन, बोलणाराचे पदरीं अविनयाचा दोष येतो, इतकेंच केवळ नाहीं तर उलटपक्षी अशा ठिकाणीं ' आम्ही ' असा प्रयोग केला असतां समुच्चयाचा बोध न होतां विनयाचा मात्र बोध होतो. हैं मराठी भाषेचे सूक्ष्म निरीक्षण केलें असतां कोणासही कळून येईल, असें आम्हास वाटतें. यासाठीं आपल्यामध्ये कसें बोलण्याचा प्रघात आहे एवढेच वाच- कांनी पहावें, असें आमचें त्यांस सांगणे आहे. 'दें घर कोणाचें ' म्हणून जर आपणांस कोणी विचारले तर 'हें घर आमचें आहे' असे आपण चटकर उत्तर देऊं. तेच ' हैं घर माझें आहे' असे उत्तर दिले तर तें उद्धटपणाचें होत नाहीं काय ? अशी उदाहरणे बोलण्यांत नेहमी येतात. त्यांकडे विचारपूर्वक लक्ष देण्याचीच काय ती जरूर आहे, तैं दिलें असतां वरील आमच्या म्हणण्याचा प्रत्यय येईल. 'मी, मी ' व ' माझें व माझें ' असा स्वतःविषय एकेरी