पान:व्हेनिस नगरचा व्यापारी.pdf/३२

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

व्हेनिसनगरचा व्यापारी - प्रस्तावना. २९ ह्या जी रुढी आहे, ती लक्षांत ठेवण्यासारखी आहे. पण कित्येक लेखकांचें अनेक प्रसंग ह्या रुढीकडे दुर्लक्ष होतें, असें दिसून येतें. उदाहरणार्थ, ' नाना आणि महादजी ' लहानशा पुस्तकाचीच प्रस्तावना पहा. हें पुस्तक मराठीतील प्रसिद्ध विद्वान् लेखक प्रो. चिंतामण गंगाधर भानू यांनी लिहिले आहे. सदर पुस्तकाच्या पांच सहा ओळींच्याच प्रस्तावनेचा आशय हा आहे की, 'नाना आणि महादजी ' ह्या मुत्सद्यांच्या संबंधानें जे कित्येक निबंध त्यांनी लिहून केसरी पत्रांत प्रसिद्ध केले होते तेच त्यांनीं स्वतंत्र पुस्तक- रूपाने वेगळे छापून काढले. केसरीतील लेख संपादकाच्या नात्याने लिहिले असल्यामुळे त्यांत ठिकठिकाणी स्वमत दर्शवितांना स्वतः विपय 'आम्ही' असा प्रयोग त्यांनी केला होता. त्याच्या ऐवजी ह्या स्वतंत्र पुस्तकांत 'मी' असा एकेरी प्रयोग योजिला आहे. एवढाच काय तो फरक केला आहे. याशिवाय दुसरा कोणताही फेरफार केलेला नाहीं. आणि हा फेरफार करण्याचे कारण ते असे दर्शवितात, कीं ह्यांत दर्शविलेले विचार आपले एकट्याचे असल्यामुळे 'मी' असा एकेरी प्रयोग करणेच योग्य आहे. ह्याप्रमाणे प्रोफेसर साहेबांनी येथे आपली लीनता दाखविण्याचा जो मोठा आव घातला आहे तो केवळ अस्थानीं होय असें आम्ही नम्रपणे म्हणतो. मराठी भाषेत 'मी ' ह्या शब्दांत कोणता अर्थ दाखविण्याचे सामर्थ्य आहे आणि ' आम्ही ' ह्या शब्दांत किती अर्थ संकेतित केलेला आहे ह्याविपय प्रोफेसर साहे- बांनी विचार केला आहे काय ? केला आहे असें दिसत नाहीं. ते केवळ इंग्रजी भाषेतील रुढीकडे पाहून घसरले आहेत असें म्हणणे प्राप्त आहे. इंग्रजी भाषेच्या व्याकरणाचें ४